Uncategorized
रांझणी गावच्या ग्रामस्थ व महिला, लहान मुलांनी सहभागी होऊन सुरू केले आमरण उपोषण…
उपोषण स्थळी अमर पाटील यांनी दिली भेट

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
प्रतिनिधी/-
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे भाऊ अमर पाटील यांनी पंढरपूर येथील तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषणस्थळी भेट देऊन प्रांत अधिकारी .गजानन गुरव यांना फोनवर बोलून लवकरात लवकर मार्ग काढावा असे सांगितले.
रांझणी येथील रस्ता क्रमांक 204 रांझणी- शिंदे वस्ती या रस्त्यास निधी मंजूर असून अद्याप झालेला नाही. त्यामुळे नागरिकास येण्या-जाण्याची हेडसाळ होत आहे. आपला जीव धोक्यात घालून त्या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. यासाठी रांझणी गावच्या ग्रामस्थ व महिला, लहान मुलांनी सहभागी होऊन आमरण उपोषण केले आहे. यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी भेट दिली.