Uncategorized

माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचे एकाधिकारशाही व दुटप्पी धोरणामुळे समविचारी स्वाभिमानी पँनल निवडणुक लढवित आहे–तात्यासाहेब बागल

पत्रकार परिषदेत समविचारी स्वाभिमानी पँनलचे उमेदवारानी दिली आ.सावंत यांचे कारभाराची माहीती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 श्रीकांत कसबे

पंढरपुर:- माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचे नेतृत्वाखाली शिक्षक पतसंस्थेचा कारभार आजपर्यंत सभासदांची पिळवणूक व अपमानस्पद वागणूक देणे,जवळच्या माणसाचे प्रकरण करणे व ईतराची अडवणुक करणे या त्यांच्या एकाधिकारशाही व दुटप्पी धोरणामुळे सभासदामध्ये नाराजी निर्माण झाली त्यामुळे समविचारी स्वाभिमानी पँनल स्थापन करुन२०२२-२३ते२०२७-२८ या पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहीती पँनल प्रमुख तात्यासाहेब गुंडीबा बागल (चेअरमन जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था बाळे,सोलापुर)यांनी पत्रकार परिषदेत दिली.
७००० सभासद असणारी पतसंस्था ४००० सभासदावर आली असून यामध्ये फक्त २६२५ लोकांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे,कर्ज मर्यादा १२लाख केली असे सांगत आहेत पण बँकेत पैसा नसल्यमुळे सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक महिने सभासदांना कर्ज मिळत नाही .मर्जीतील सभासदांना कर्ज देऊन दूजाभाव केला जातो,पारदर्शी कारभार चालविणार्या आ.सावंत यांनी एप्रिल २०२१मध्ये १२लाख कर्ज घेतले त्याचे हप्ते एक वर्ष भरले नव्हते .निवडणुक कार्यक्रम जाहिर झाले नंतर ३ मार्च  २०२२ रोजी दोन लाख छत्तीस हजार भरणा केला, त्यांचे पँनलचे उमेदवार माणिक गायकवाड़ यांची शाळा ४०% असताना त्यांना १२लाख कर्ज दिले.त्यावेळेस ३९हजाराचे आसपास पगार दाखविला असून  दुसर्याच दिवशी १लाख ५ हजार पगार दाखवून तातडीचे कर्ज २५ हजार घेऊन फसवणूक केली आहे .यासारखे अनेक आरोपाचा पाढाच बागल यांनी पत्रकार परिषदेत वाचला.
यावेळी पुर्वि संचालक असलेले व सध्या निवडणुक लढवीत असलेले अनुसूचित जाती/जमातीचे उमेदवार धनंजय भगवान बनसोडे यांनी आ. सावंतवर जातीयवादी असल्याचा आरोप केला,पतसंस्थेच्या इतिहासात कोणत्यही चेअरमनचा अगोदर राजिनामा घेतला नव्हता.परंतु मी दलित असल्याने माझा राजिनामा अगोदर घेतला.त्यांचे कथीत सल्लागार कान भरत असल्याचा आरोपही बनसोडे यांनी केला.
यावेळी सर्वसाधारण जागेतून लढणारे उमेदवार नाना आण्णा मारकड म्हणाले की,  जुनी पेन्शन योजना लागू करुन देतो म्हणून प्रत्येक शिक्षकाकडून चार हजार रुपया प्रमाणे  चार कोटी रुपये शिक्षक आमदार सांवत यांनी जमा केले त्याचे व पेन्शन योजनेचे काय झाले हा शिक्षकांचा प्रश्न आहे. मतदारांची अंतीम यादी जाहीर झालेली असताना सुध्दा व निवडणुक दोन दिवसावर आली असताना ७४लोकांची नावे रद्द करण्याचे कट कारस्थान केले,   निवडणुक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही केला.विद्यमान १६उमेदवारांना उमेदवारी न देता तद्न्य संचालक समाधान घाडगे यांना उमेदवारी दिली.तेच आ.सावंताचे विश्वासू म्हणून कारभार करण्याचा प्रयत्न करत होते.१६ पैकी आमचेकडून २जण निवडणुक लढवित असुन १०जणांचा आम्हास पाठींबा आहे.
“स्वच्छ आणी पारदर्शी कारभाराची हमी “आमचे घोषवाक्य आहे.असे सांगून २०० कोटीची उलाढाल असणारी बाळे  पतसंस्थेचे हित जोपासण्यासाठी २०नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणूकीत समविचारी स्वाभिमानी पँनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतानी विजयी करावे असे आवहान केले.

या पत्रकार परिषदेस सर्वसाधारण उमेदवार संजीव शरणप्पा अळगी मंद्रुप,अरुण दिगंबर खटकाळे मानेगांव ता.सांगोला, हनूमंत अंबादास जोडबोटे भैरवनाथवाडीता.पंढरपुर, सुनिल महादेव नागणे मंगळवेढा,कल्लप्पा लक्ष्मण बुळ्ळा डिग्गेवाडी ता.अक्कलकोट, संजय दत्तात्रेय रणदिवे तुंगत ता.पंढरपुर, सतिश राजाराम विभूते राजूरी ता.सांगोला, बाळासाहेब माणिकराव शिंगाडे फुलचिंचोली ता.पंढरपुर,ईतर मागासवर्गीय प्र.उमेदवार बाळासाहेब मच्छिंद्र अडसुळ सावळेश्वर ता.मोहोळ,वि.जाती/भ.जमाती उमेदवार दादासो बयाजी वाघमोडे सांगोला , यांचे सह अनेक सभासद उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close