शेतकरी व ऊस उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी आवताडे शुगर कटीबद्ध – संजय आवताडे
आवताडे शुगरच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा रोलर पूजन संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
(मंगळवेढा प्रतिनिधी): नंदूर येथील आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि. चा आज दुसऱ्या गळीत हंगाम २०२३-२४ च्या पूर्व तयारीच्या अनुसंगाने आज काखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांचे शुभहस्ते पूजा करून मिल रोलर समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती सोमनाथ आवताडे, मा. उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, सरव्यवस्थापक सुहास शिनगारे, भारत निकम, विजय माने, विलास राठोड, बंडू हाके, उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील हंगामात शेतकरी वर्ग व ऊस उत्पादकांच्या अर्थिक सुबत्तेसाठी आणि सक्षमीकरणासाठी पहिल्या हंगामामध्ये शेतकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवून सुरवाती पासून शेवट पर्यंत खाजगी कारखान्यामध्ये उसाला भरीव व अपेक्षित दर देण्याचा विक्रम आपल्या कारखान्याच्या नावावर झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या हंगामामध्येही शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण हिताला निश्चितपणे प्राधान्य देण्यासाठी आम्ही सतत कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन चेअरमन संजय आवताडे यांनी केले आहे.
तसेच कारखान्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व विभागाचे अधिकारी, व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने आवताडे शुगरने पहिल्याच वर्षी कमी कालावधीमध्ये सुरु करून विक्रमी गाळप करुन जिल्ह्याच्या साखर कारखानादारीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या शेतकरी व ऊस उत्पादकांच्या जीवनामध्ये आर्थिक मार्गाने सुबत्ता आणण्यासाठी आम्ही सार्वजनिक प्रयत्नवादी राहणार आहे. गळीत हंगाम २०२३-२४ साठी कारखाण्याचे वाहनाचे करार पूर्ण झालेले असून पहिल्या हप्ताचे वाटप चालू झालेले असल्याबाबत माहिती देण्यात आली तसेच अचूक नियोजन आणि उत्कृष्ट प्रशासन यांची सांगड घालून मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कारखाना जोमाने सुरु होईल आणि गाळप उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वासही चेअरमन संजय आवताडे यांनी व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर प्रथम वर्षी शेतकरी, ऊस उत्पादक, वाहतूकदार व इतर प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून गळीत हंगाम यशस्वी झाला असून त्याच जोमाने या वर्षीसुद्धा सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी करू असा विश्वासही चेअरमन आवताडे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी, नंदुरचे माजी सरपंच दामोदर कांबळे, चिफ केमिस्ट मोहन पवार, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, एच आर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, सिव्हिल इंजिनिअर संतोष कदम.. फायनान्स मॅनेंजर रघुनाथ उन्हाळे, डिस्टीलरी मॅनेंजर संभाजी फाळके, इन्ट्रुमेट मॅनेंजर मनोज होलम, प्रोडक्शन मॅनेंजर अभिजित पवार, परचेस मॅनेंजर अजय सरवळे, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, सहाय्यक सुरक्षा अधिकारी रणजित पवार आदी मान्यवर व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.