विवेक वर्धिनी येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर -विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.पहिल्याच दिवशी प्रशालेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले यामुळे सर्व विद्यार्थी आनंदी व हसतमुख होऊन प्रशालेमध्येमध्ये प्रवेश करत होते.यावेळी प्रशालेचा परिसर स्वच्छ करून सजवण्यात आला होता. नूतन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागतोत्सवासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवजी वाघ, सचिव ॲड. वैभव टोमके,खजिनदार सलीम वडगावकर, सर्व संस्था संचालक पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या, यावेळी प्राचार्य उत्तरेश्वर मुंढे, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक अशोक पवार, बाबासाहेब सिरसट, नितिन कदम, मुख्य लिपिक हनुमंत मोरे, आधिक्षक अमोल हुंगे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.