सुनील वाघमारे राज्यस्तरीय समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानीत!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
अनवली :-लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था,गादेगांव ता.पंढरपूर जि. सोलापूर यांचेवतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी दिला जाणारा “राज्यस्तरीय समाजभूषण गौरव पुरस्कार “प्रबुद्ध परिवाराचे मार्गदर्शक सुनील वाघमारे यांना घोषित करण्यात येऊन त्याचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती दिवशी अनवली ता. पंढरपूर येथे सुनील वाघमारे यांचे निवासस्थानी सुनील वाघमारे व त्यांच्या सुविध्य पत्नी आयुष्यमती अवंतिका(माजी सरपंच )या उभायंतांचा सन्मान श्रीकांत कसबे , सम्पादक जोशाबा टाईम्स, प्रा. शिवाजीराव वाघमारे सर, व संस्थेचे अध्यक्ष जैनुद्दीन मुलांणी यांचे हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, व पुष्पहार देऊन करण्यात आला. यावेळी मान्यवारांनी मनोगत व्यक्त केले सुनील वाघमारे यांनी सत्काराला उत्तर देताना पुरस्कार दिले बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नवनाथ भंडारे मेम्बर, धीरज कांबळे, विशाल भंडारे, अमित भंडारे, अमर भंडारे , सत्वशील भंडारे, सुरज भंडारे, प्रतीक भंडारे, रोहित भंडारे, प्रज्वल बनसोडे, अतुल भंडारे, राजू ओव्हाळ, रजनीकांत लोखंडे, शौर्य भंडारे, सुहास भंडारे, यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.





