दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी सोमनाथ डोंबे, उपाध्यक्षपदी विजयकुमार कोठारी यांची निवड

विजयकुमार कोठारी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर (दि.12):- दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लि., पंढरपूरच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकरिताची सभा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक पी. सी. दुरगुडे यांचे अध्यक्षतेखाली आज सोमवार दिनांक १२ जून २०२३ रोजी देशभक्त वि.औ. तथा बाबुराव म्हमाने सभागृहात संपन्न झाली. सदर सभेमध्ये अध्यक्ष म्हणून सोमनाथ सदाशिव डोंबे तर उपाध्यक्ष म्हणून विजयकुमार कांतीलाल कोठारी यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी बँकेचे संचालक सर्वश्री नागेश भोसले, भगीरथ म्हमाने, राजेंद्र फडे, विजयकुमार परदेशी, अमरजित पाटील, पांडुरंग शिंदे, शितल तंबोली, भारत भिंगे, वसंत शिखरे, सौ.मंजुश्री भोसले, सौ. सुनंदा गांधी, संजय जवंजाळ, आदित्य फतेपूरकर उपस्थित होते.
यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष नागेशकाका भोसले व संचालक शितल तंबोली यांचे हस्ते नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी बँकेचे सभासद सर्वश्री सुधीर भोसले, मुकुंद मर्दा, राजकुमार गांधी, नंदकुमार ठिगळे, शाम गोगाव, विजय खंडेलवाल,नागनाथ लिगाडे, युवराज भोसले, राहुल शिंदे नाईक, नवनाथ शिंदे. अमोल आटकळे, आदि सभासद व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बँकेचे व्यवस्थापक अतुल म्हमाने व उपव्यवस्थापक रमेश कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक आदित्य चंद्रकलेश्वर फतेपूरकर यांनी मानले.