Uncategorized

आमच्या स्वाभिमानाला धक्का लावाल तर याद राखा..! गणेश पाटील यांचेकडून अभिजीत पाटील यांना उघड आव्हान

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर/प्रतिनीधी – *पंढरपूर तालुक्यातील सुरू असलेल्या सहकार शिरोमणी च्या निवडणुकीत काही नव्याने राजकारणात येत असल्याने या तालुक्यातील राजकारणाची संस्कृती बाजूला सारून, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ती अफवा पसरविण्याचे कारस्थान सुरू ठेवले आहे. आतापासूनच सर्व काही माझं माझं म्हणत उंच खुटीला हात घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. तुम्ही काहीही लबाड सांगत असताना आमच्या स्वाभिमानाला धक्का देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जाणवत आहे. यामुळे तुम्हाला यापुढे याची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार नाही. असे जाहीर आव्हान गणेश पाटील यांनी चेअरमन अभिजीत पाटील यांना दिले आहे.

भाळवणी येथे शनिवारी काळे गटाच्या उमेदवार यांच्या प्रचार बैठकीत गणेश पाटील आक्रमकपणे बोलत होते. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, भगीरथ भालके, समाधान काळे, सुधाकर कवडे, साईनाथ अभंगरलराव, मारुती जाधव, समाधान फाटे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना गणेश पाटील म्हणाले की, ही निवडणूक कारखान्याची आहे की विधानसभेची हेच विरोधकांना समजेनासे झाले आहे. यामध्ये आपण उंच खुटिला हात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु तुमची खुटीच उपडून काढू असेही त्यांनी सांगितले. या तालुक्यात विठ्ठल आणि सहकार शिरोमणी कारखान्यामुळे तालुक्यातील विठ्ठल परिवाराची मोठी आर्थिक जडणघडण झाली आहे. या सहकार शिरोमणी ने केवळ ऊस घालून साखर विकली नाही. तर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.त्यामधे अनेकांना मोठा आधार मिळाला आहे.त्यामुळे या अडचणीच्या काळात लोक ते उपकार विसरणार नाहीत. असेही आवर्जून गणेश पाटील यांनी सांगितले. तुम्ही आमच्यावर आणि हयात नसणाऱ्या लोकावर टीका करत सुटला आहे. यापुढे खास तुझ्यासाठी विरोध म्हणून कायम आम्ही एकत्रित राहून तुला कायमची उटी टाकणार असल्याचे सांगितले.

तू राजकारणात आता आला आहे. आमच्या तीन पिढ्या राजकारण करत आहेत. त्या माध्यमातून अनेकांना मदत केली आहे. त्यामुळे तुझ्या लबाड बोलण्याला आता हा सभासद भुलणार नसल्याचेही गणेश पाटील यांनी सांगितले.

या बैठकीचे वेळी चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपल्या भाषणात आपण आजवर सर्व काही व्यवस्थित चालवत आलो होतो. काही अडचणी आल्याने सध्या अडचणी आली असली तरी आपण सर्व देणी देण्यासाठी बांधील असून आपल्या शब्दावर सभासद विश्वास ठेवतील. यामुळं कितीही खोटं सांगून अफवा पसरविल्या तरी आमच्या निष्ठावंत सभासद यांच्यावर आमचा भक्कम विश्वास आहे. असेही सांगितले.

या बैठकीस उपस्थित असलेले सुधाकर कवडे, मारुती जाधव, समाधान काळे, नितिन बागल, साईनाथभाऊ अभंगराव , समाधान फाटे, यांच्यासह नेत्यांनी भाषणे करताना अभिजीत पाटील यांच्यावर टीका केली.

यावेळी शहाजी साळूंखे, अर्जुन जाधव, गोरख जाधव, परमेश्वर लामकाने, सुरेश देठे, तानाजी केसकर, दिपक गवळी, सुनिल पाटील, शकील काझी, दिलीप भानवसे,रणजित जाधव, निहाल शेख, मुन्ना इनामदार, सागर चौगुले, रवि शिंगटे उपस्थित होते.

विषारी प्रवृत्ती वेळीच गाढण्यासाठी एकत्र : भगीरथ भालके

विठ्ठलाच्या निवडणुकीत आमच्याच चुकीमुळे चुकीचा माणूस आला आहे. अफवा आणि चुकीचा प्रचार करून सत्ता मिळवली. यामुळे आता या निवडणुकीच्या आडून आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही विष कालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही विषारी प्रवृत्ती गाढण्यासाठी आम्ही सगळे आलो आहोत. असे भगीरथ भालके यांनी सांगितले. मी स्व नानाचा कार्यकर्ता होतो. असे म्हणत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हा कुठंही दिसला नसल्याचेही अभिजीत पाटील यांना उद्देशून भालके यांनी सांगितले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close