Uncategorized

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा मिल रोलर पूजन

पोळ्यासाठी देण्यात येणाऱ्या १००रुपये हप्त्याचे शेतकऱ्यांना लागवडीसाठी आताच होणार वाटप....

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे 

प्रतिनिधी /पंढरपूरस सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामध्ये ऊस बिलाचा मुद्दा चांगलाच गाजत असतानाच,विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मात्र श्रीविठ्ठल कारखान्याकडून पोळ्यासाठी वाटप करण्यात येणारा १००रुपयाचा हप्ताचे शेतकऱ्यांसाठी लागवडीसाठी हप्ता आताच वाटण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे ऐन निवडणुकीतील वाटप चेअरमन कल्याणराव काळे यांना अडचणीचे ठरणार आहे…..

पंढरपूर तालुक्यात होत असलेल्या या निवडणुकीत मोठी राजकीय चर्चा होत असताना, एकीकडे अभिजीत पाटील यांनी मात्र श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये आलेल्या उसासाठी पूर्वी २३०० रुपये जमा केले आहेत. पोळ्यासाठी आणि दीपावली साठी १००प्रमाणे वाटप करून आश्वासन दिल्याप्रमाणे २५००रुपये जमा होणार आहेत. हा १०० रुपयेच दुसरा हप्ता आताच मिळणार असून त्याची सुरुवात काळे यांचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी गटातून होणार आहे. यामुळे विठ्ठल परिवारात मोठी चर्चा सुरू झाली आहे.एकीकडे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नसल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजी असताना, मात्र अभिजीत पाटील यांनी मोठा मास्टर टोक करत, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सात ७लाख २६हजार गाळप केलेल्या टनाचे दुसरा हप्ता म्हणून १००रुपये आज शेतकऱ्यास जाहीर केले आहे

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे आज गळीत हंगामाचे रोलर पूजन हभप माधव महाराज नामदास (संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज) व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील, व्हाईस चेअरमन प्रेमलाताई रोंगे, स्वेरीचे संस्थापक डाॅ. बी.पी रोंगे सर, युवा नेते दीपक पवार यांच्या उपस्थित संपन्न झाला….

यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच शेतकरी सभासद, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close