गीतांजली कोळी यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास व त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास महाराष्ट्र पेटेल — गणेश अंकुशराव.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपुर [प्रतिनिधी ] धुळे जिल्हा कोळी समाजाच्या अध्यक्षा सौ गीतांजलीताई कोळी या 25 एप्रिल 2023 पासून महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी,मल्हार कोळी जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे म्हणून उपोषणाला बसलेल्या आहेत आज 14 दिवस पूर्ण झाले आहेत परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे गीतांजली कोळी यांच्या जीविकास धोका निर्माण झाला आहे. उपोषणाची दखल न घेतल्यास व त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आज दिला आहे.
पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक येथे धुळे जिल्हा प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत.
राज्यघटनेच्या कलम 14 नुसार महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जात वंश परंपरा व राहण्याच्या ठिकाणावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही असे असताना सुद्धा आदिवासी विभागाचे 25 आमदार व चार खासदार प्रांताधिकारी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या विस्तारित क्षेत्रातील 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमाती वरती अत्याचार करत आहेत घटनेच्या कलम 342 नुसार दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळू देत नाहीत .सातत्याने खोटा प्रचार करत आहेत त्यांचा निषेध करतो तसेच 14 दिवस झाले अन्न पाण्याविना गीतांजलीताई कोळी यांचे आमरण उपोषण धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू आहे प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी 14 दिवस उपोषण केल्यामुळे गीतांजली ताई यांना प्रचंड थकवा जाणवत आहे त्यांची तब्येत ढासळत चाललेली आहे कोणत्याही क्षणी त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव प्रशासनाने ठेवावी गीतांजली ताई यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा त्यांनी दिला आहे. निषेध याच्या घोषणा आणि संपूर्ण परिसर दणाणून गेला होता .
यावेळी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव,सोमनाथ मगर पांडुरंग कांबळे, आप्पा करकमकर ,सुरवसे सर ,संपत सर्जे, सुरज कांबळे विकी अभंगराव पिंटू करकमकर पांडुरंग माने कृष्णा वाडेगावकर विकी आधटराव वासुदेव परचंडे, दादा सर्जे,अमोल तावसकर पंकज अंकुशराव, गुंडू नेहतराव,महेश भाळवणकर, मंगेश मुसळे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी कोळी बांधव उपस्थित होते.