पंढरीत आषाढी यात्रे निमीत्त ४ जुलै पासून सुरु होणार सुपर स्टार सर्कस
संपूर्ण भारतात एक मात्र महाराष्टीयन सर्कस

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- संपूर्ण भारतात गाजत असलेली एक मात्र महाराष्टीयन सर्कस “सुपर स्टार सर्कस “सोमवार दिनांक ५जुलै रोजी सुरु होणार असुन माजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले,माजी उपनगराध्यक्ष नागोश भोसले,शिवसेना नेते जयंत माने व मान्यवरांच्या उपस्थीतीत उद्घाटन होणार असल्याची माहीती सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी पत्रकारांना दिली.
या सर्कस मध्ये नेपाळ, आसाम,केरळ,तामिलनाडु, गुजरात, महाराष्टा मधील कलाकारांचा समावेश असुन अनेक नाविन्यपुर्ण व नेत्रदिपक प्रयोग सादर केले जाणार आहेत.
सर्कस मध्ये कलाकारासह ८० लोक असून मधल्या कोरोना काळात आम्हा कलाकारांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.गेल्या तिन पिढ्यापासून मी सर्कस चालवित असून या कलाकारांना जगविण्यासाठी मला पावणेदोन वर्ष फार त्रास झाला आहे.आपण प्रेक्षक हेच माझे दैवत आहे.तरी आपण सर्वानी हि सर्कस आवश्य सहकुटंब पहावी असे आवहान प्रकाश माधव माने यांनी केले आहे.
आपण खुप सर्कस बघीतली असेल पण ही सर्कस एकदा आवश्य पहा कारण भारतातील सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे. असे हे प्रकाश माने यांनी आवहान केले आहे. यावेळी व्यवस्थापक ज्वालासिंग उपस्थीत होते.
दुपारी १,वा.४,वा.७,वा.प्रयोग असुन तिकिट दर गँलरी रु. १००/- खुर्ची रु.२००/-,व्हीआईपी रु.२५०/- स्टार सर्कल रु.३००/- असुन विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत दिली आहे.सर्कसचे प्रयोग वरील वेळेत सरगम चौक,स्वराज टँक्टर शोरूमच्या मागील पटांगणात भव्य तंबुत होणार आहेत.