Uncategorized

स्वेरी मध्ये दि. १५ व दि १६ सप्टेंबर रोजी ‘ऑलम्पस २ के २२’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

छायाचित्र- दि.१५ व दि.१६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘ऑलम्पस २ के २२’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन करताना जेष्ठ विचारवंत व व्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर जाधव, शिवणे उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.विजयकुमार वाघमोडे, अण्णासाहेब पाटील उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आबासाहेब सलगर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष नामदेव कागदे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व इतर मान्यवर.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर-गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या दि. १५ व दि १६ सप्टेंबर रोजी ‘ऑलम्पस २ के २२’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाच्या पोस्टरचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
‘शिक्षक दिना’चे औचित्य साधून ‘ऑलम्पस २ के २२’ या उपक्रमाच्या पोस्टरचे उदघाटन शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ विचारवंत व व्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर (माऊली) जाधव, शिवणे उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.विजयकुमार वाघमोडे, अण्णासाहेब पाटील उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आबासाहेब सलगर यांच्या हस्ते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष नामदेव कागदे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘ऑलम्पस २ के २२’ च्या राष्ट्रीय स्तरावरील तंत्रस्पर्धेत ड्रॉ कॅड, कटिया थॉन, टेक्नो मेक क्विझ, ब्रीज मेकिंग, कॅड रेस, सिव्हील टेक्नो क्विझ, सर्वे हंट, इलेक्ट्रो एक्सटेम्पोर, ई-क्विझ, इलेक्ट्रिकल मास्टर, मिरर कोड, टेक एनिमेशन, कॉम पोस्टराईज,एनएफएस, सर्किट सुडोको, प्रोग्राम मनिया, वीन टू बझ, पेपर प्रेझेन्टेशन, अॅग्रो चॅलेंज- प्रोजेक्ट कॉम्पिटीशन, फन झोन असे एकूण २१ तांत्रिक इव्हेंटस् असून यासाठी विजेत्यांना जवळपास एक लाखांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, समन्वयक प्रा. डी.टी. काशीद यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या वतीने ऑलम्पस २ के २२ चे विद्यार्थी अध्यक्ष प्रमोद आवळेकर, विद्यार्थी सचिव दीपक शिंदे, उपाध्यक्षा राजनंदिनी पवार, सहसचिव आयेशा मुजावर, खजिनदार जान्हवी देवडीकर, सहखजिनदार श्रेयस कुलकर्णी, प्रा. सचिन काळे, प्रा.नितिन मोरे, प्रा.सहदेव शिंदे, प्रा.विजय सावंत, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. ‘ऑलंम्पस २ के २२’ च्या निमित्ताने अभियांत्रिकीच्या सर्व विभागात जय्यत तयारी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. ‘ऑलम्पस २ के २२’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा. दिगंबर काशीद (८२०८७२४२६६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close