गुरुजींच्या ज्ञानाने विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने होते—सिनेअभिनेता राहुल हजारे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- गुरुजींनी दिलेल्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने होते विद्यार्थ्यांनी गुरुजन आणि पालकांचा आदर ठेवून आपले जीवन उंचवावे असे मत सिने अभिनेता राहुल हजारे यांनी व्यक्त केले.ते श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे हे होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. उत्तरेश्वर मुंढे यांनी केले.
वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांनी केले. पाहुण्यांची ओळख राजूभाई मुलाणी यांनी करून दिली. प्रशालेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन करून पाहुण्यांचे स्वागत केले .यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रशालेत स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या बौद्धिक व क्रीडा स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक विजयकुमार माळवदकर उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे,पर्यवेक्षक सुनील पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख संजय पवार ,तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे,
शिक्षक प्रतिनिधी सुनील विश्वासे,पाटील व्ही.आर, सविता उपलप , क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे, राहुल दळवी ,मुख्य लिपिक हनुमंत मोरे, सोमनाथ फडतरे ,दिलीप रानगट्टे विवेक चौगुले ,बाबासाहेब सिरसट,युवराज परचंडराव,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्तेश्वर मुळे,मोहिनी जरे यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधि सुनिल विश्वासे यांनी मानले. यावेळी मुक्ता जोगदंड हिने पसायदान म्हटले. कार्यक्रम मोठ्या उत्साह संपन्न झाला.