श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुंढेवाडी येथे इंग्रजी सप्ताह 2023 चा कार्यक्रम संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
मुंढेवाडी:- श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुंढेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आज इंग्रजी सप्ताह 2023 चा कार्यक्रमचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाराध्ये आर.डी पाराध्ये सर , प्राचार्य विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य पाराध्ये आर डी सर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे महत्त्व आणि भावी जीवनात आपण कशाप्रकारे स्वतःच अस्तित्व निर्माण करावे आणि इंग्रजीचे भविष्यातील महत्त्व याविषयी सखल मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषेचं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणारे महत्त्व आणि त्याचा आपल्या इंग्रजी भाषेचं आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणारे महत्त्व आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी असणारा सहसंबंध याविषयी मार्गदर्शन केले.
:या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत काबळे डी, बी.यांनी केले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक खिलारे बी.डी. हे होते. त्यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंबळे डी.बी.यांनी केले.शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रशालेची विद्यार्थिनी श्रुती मोरे हिने मानले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व सेवक वर्गांच परिश्रम घेतले.