Uncategorized

तालुक्यातील मागासवर्गीय 15% विकास निधीची ग्रामपंचायतवार चौकशी करणार– तालुकाध्यक्ष रवींद्र हंकारे

पुरोगामी संघर्ष परिषद हातकणंगले तालुका सक्रीय

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

*मिणचे* [ता.हातकणंगले]:- मागासवर्गीयांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या 15% रक्कम ही मागासवर्गीय विकास निधी म्हणून वापरावयाची असून सदर 15% निधिमध्येच गाव पातळीवर जास्त भ्रष्टाचार करून मागासवर्गीयांना विकासापासून दूर ठेवल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये सदर 15% विकास निधीमध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे हे स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन व प्रत्यक्ष जागेवर पंचनामा करून आणि माहितीच्या अधिकारात सदर गावचे ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून माहिती घेऊन रितसर गटविकास अधिकाऱ्यांच्या समोर पंचनामा करून सदर दोषींच्यावर ऍट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हे नोंद करण्याची कारवाई करणार असल्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष रविंद्र हंकारे यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे बोलताना हंकारे यांनी सांगितले की, या सर्व घटनेला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांना सुद्धा सह आरोपी करण्यात येणार असून ग्रामपंचायत 15% मागासवर्गीय विकास निधी ही आता आरपारची लढाई पुरोगामी संघर्ष परिषद करणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close