विवेकच्या विद्यार्थिनींसाठी इनरव्हील क्लब तर्फे सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन भेट

विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयात इनार व्हील क्लब तर्फे सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन भेट देताना क्लबच्या अध्यक्षा मिरा परिचारक ,सुजाता यादगिरी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे व इतर.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेकवर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इनरव्हील क्लब पंढरपूर मार्फत मुलींसाठी वेंडिंग मशीन व डिस्ट्रॉय मशीन अशा दोन मशीन भेट देण्यात आल्या.त्यावेळी
कुमारवयीन मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे या वयात होणारे बदल व अशा बदलांना कशाप्रकारे सामोरे जावे याचे मार्गदर्शन क्लबच्या माजी अध्यक्षा मीरा परिचारक यांनी केले.
महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे, कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी कसे प्रयत्न करावेत याविषयी मार्गदर्शन विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या व क्लबच्या माजी अध्यक्षा सुजाता यादगिरी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये होते. कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार सलीम वडगावकर उपस्थित होते.
या कार्यक्रमा साठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली काशीद, उपाध्यक्षा अनुराधा हरिदास उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक चौगुले यांनी केले व आभार भगवती शिंदे यांनी मानले.
कार्यक्रमाचे नियोजन अविनाश कटकधोंड, प्रेमा पाटील यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.