विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर:-दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालय येथे माध्यमिक विभागातील इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र पाराध्ये हे होते त्यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या जगाबरोबर स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे व स्वयंशिस्त ठेवून जीवनातील परीक्षेत यशस्वी व्हावे सांगितले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे यांनी केले प्रस्ताविकामध्ये जुनियर कॉलेजमधील अत्याधुनिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी केलेले शैक्षणिक नियोजन या संदर्भात माहिती दिली. यावेळी माध्यमिक विभागाचे राजूभाई मुलाणी , देवीदास चेळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यावेळी दहावीच्या वर्ग शिक्षक सतिश भंडारे, भारत झांबरे, श्रीकांत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विवेक चौगुले यांनी केलेयावेळी सुधाकर पिसे, मधुकर भोसले, अविनाश कटकधोंड ,प्रदीप व्यास विजय सावंत ,एकनाथ शिंदे, जनार्दन चलवाड , गौतम रावताडे सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.