पुरोगामी संघर्ष परिषदेची पुणे ग्रामीण कार्यकारणी जाहीर


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
सासवड: – (पुणे) पुणे ग्रामीण जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेची बैठक सासवड या ठिकाणी युवक चे राज्य अध्यक्ष मनोज (दादा) भिसे यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष निखिल (भाऊ) आढाळगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन त्यामध्ये राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ.प्रा. सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
युवक प्रदेशाध्यक्ष मनोज (दादा) भिसे व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष निखिल (भाऊ) आढाळगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत किशोर भाऊ आढाळगे यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली. तसेच पूजा सोमनाथ आढाळगे यांची पुरंदर तालुका महिला आघाडी सचिव पदी निवड करण्यात आली.
तसेच बाकीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढील प्रमाणे दयानंद बबन आढाळगे यांची जाधववाडी वरिष्ठ शाखा अध्यक्ष, वैशाली दीपक मोहिते यांचे महिला आघाडी जाधवाडी शाखेचे अध्यक्ष, सोमनाथ आढाळगे यांची जाधववाडी शाखेच्या उपाध्यक्षपदी, केदार विजय शेंडगे यांची जाधववाडी शाखेच्या खजिनदार, प्रथमेश सुनील आढाळगे यांची जाधवाडी युवक शाखा उपाध्यक्ष, तर पश्चिम महाराष्ट्राच्या सल्लागार कमिटीच्या उपाध्यक्षपदी पुणे येथील मोहन जाधव यांची निवड करण्यात आली. त्यांना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक डॉ. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे सहीचे मनोज (दादा) भिसे व निखिल (भाऊ) आढाळगे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे, राज्य संपर्कप्रमुख भानुदास भिसे, दिव्यांग जिल्हा आघाडीचे जिल्हाअध्यक्ष राजेशजी आढाळगे, दिवे गारडे गण प्रमुख विजय शेंडगे,पुरंदर तालुका सचिव ज्ञानेश्वर आढाळगे, तालुका उपाध्यक्ष अमर आढाळगे,पुरंदर तालुका युवक अध्यक्ष सागर पाटोळे,दिवेगणप्रमुख दत्ता लोणारे, तालुका युवती अध्यक्ष श्वेता आढाळगे, दिवेगन महिला आघाडीचे अध्यक्ष नम्रता शेंडगे, चंद्रकांत काका आढाळगे,स्वरूप सोनवणे,कुणाल पाटोळे,इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




