धम्मचक्र प्रवर्तन दिनांकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे -प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमी रोजी नागपूर येथे बौध्द धम्माची स्वतः दिक्षा घेतली व 5 लाख लोकांना दिक्षा दिली.प्रवर्तनला पाली भाषेत पवत्तन म्हणले जाते व हॆ धम्मचक्र तथागत बुद्धाने प्रवर्तीत केले. त्यानंतर सम्राट अशोकाने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दिवशी धम्म दिक्षा घेतली व दिली म्हणुन हा दिवस अशोका विजया दशमी धम्म दिक्षा दिन म्हणुनच साजरा केला पाहिजे. या दिनांकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे असे विचार प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे सोलापूर, यांनी व्यक्त केले. ते फुले शाहू आंबेडकर विचारमंचने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विचारमंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे हॆ होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे 14 ऑक्टोबर रोजी या व्याख्यानचे आयोजन केले होते.व्याख्यानाचा विषय -“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्म क्रांती “हा होता.
पुढे बोलतांना तें म्हणाले कीं, धम्म दीक्षेसाठी नागपूर निवडण्याचे कारण बौद्ध धम्माच्या विकासासाठी भौगोलिक नागवस्ती नागपूर मध्ये आहे. नागार्जुन टेकडी वर्ध्यात आहे. वज्रयान परंपरेचे लोक व त्यांची नाग संस्कृती येथे आहे. नागपूर पासून 27 किलोमीटर वर नाग नदी वाहते. वाकाटक घराणे बौद्ध होते. नालंदा विश्वविद्यालयाचे नाते होते. यामुळे मूळची संस्कृती पुनर्जीवित करणे यासाठी 14 ऑक्टोंबर अशोका विजयादशमी हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडला. माणुसकी, सन्मान, अधिकार, इज्जतीसाठी नरकातून मुक्तता होण्यासाठी धम्म दिक्षा घेण्याचे ठरविले आज माझा पुनर्जन्म झाला असे बाबासाहेब म्हणाले होते.जे ठरविले ते बाबासाहेबांनी केले.आपली आत्ता अनुयायी म्हणून जबाबदारी काय? ओळखणे गरजेचे आहे. भिक्कूनी फक्त विहारात राहता कामा नये तर सर्वत्र फिरून प्रबोधन केले पाहिजे. विश्व बौद्ध संघटना स्थापन करणे आवश्यक झाले आहे.

आपल्या कुटुंबात बौद्ध साहित्यबाबत सजग राहिले पाहिजे. वर्षावासात भिक्कूनी आठ शील व उपसकांनी दहा शिलाचे पालन केले पाहिजे. वर्षावासात त्रिशरण पंचशील प्रत्येक कुटुंबात झाले पाहिजे. निव्वळ आरक्षणाने प्रगती नाही तर अंधश्रद्धा कर्मकांड देव देवता सोडल्यामुळे प्रगती झाली. समानता स्वातंत्र्यता, आत्म सन्मान, आत्मनिर्भरता, ही तत्वे रुजवली गेली. प्रेमाची भावना धम्म क्रांतीमुळे झाली.त्यामुळे टोकाची भूमिकांना न स्वीकारता मध्यम मार्ग दिला तो सर्वांनी अंगीकारला पाहिजे असे आवाहन दुड्डे सर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात सुनील वाघमारे म्हणाले की, बाबासाहेबांनी लिहिलेले साहित्य आम्ही वाचणार आहे का नाही? त्यांनी दिलेल्या मार्गाने कार्यरत होणार की नाही? कारण मानवी साधनाला पर्याय नाही हे कार्य आपण नाही केले हे विचार वाहून नेणार कोण ?
बाबासाहेबांनी 1956 ला जरी धर्मांतर केले असले तरी त्याची सुरुवात त्यांनी अगोदरच केली असल्याचे मिलिंद व सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नावावरून जाणवते. येथील अमानवी व्यवस्था उध्वस्त करण्याची जबाबदारी शिकलेल्या लोकांची जबाबदारी आहे. समता स्वातंत्र्य बंधुता ही मूल्य असणारी सामाजिक आचारसंहिता म्हणजे “बुद्ध आणि त्याचा धम्म “व राष्ट्रीय आचारसंहिता म्हणजे” संविधान” होय. ही दोन पुस्तके म्हणजे आमच्यासाठी अनमोल ठेवा आहे.धम्म हा विज्ञानवादी, चिकित्सक आहे तर धर्म हा अज्ञानावर अवलंबून असतो. त्यामुळे विज्ञानवादी धम्माशिवाय जगाला पर्याय नाही . धम्माची चळवळ गतिमान झाली पाहिजे. त्यासाठी आपण कार्यरत असले पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब दोडके सर यांनी केले. प्रस्ताविक राजेंद्र सर्वगोड यांनी केले.तर आभार गुरु दोडिया यांनी मानले.
कार्यक्रमाचे सुरुवातीस बुद्ध वंदना घेण्यात येऊन सामूहिक त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले.


