Uncategorized

आम आदमी पार्टी पंढरपूर नगरपालिका निवडणुक लढविणार–एम.पाटील

पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

शैक्षणिक व आरोग्य सुविधा मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून त्यासाठीआम आदमी पार्टी लढा देणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे नागरी सुविधांचा अभाव असून यासाठी जबाबदार पंढरपूर नगरपालिका सत्ताधारी व प्रशासन असून पंढरपूरवासी यांना नागरी सुविधा योग्य पद्धतीने तसेच सातत्य ठेवून दिले जात नाहीत आरोग्य सेवा, स्वच्छ पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छ करणे, व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य फेरीवाले इतर व्यवसायिक यांना कोणत्याच प्रकारचा आधार वाटावा असं कोणतेच काम नगरपालिकेकडून होत नाही यामधून सत्ताधिकारी व प्रशासनात समन्वय नसल्याचा दिसून येते.
*पंढरपूर कॅरिडॉर हा सर्वसामान्य जनतेला पंढरपूर शहरवासीयांना विश्वासात घेऊनच झाला पाहिजे पंढरपूरचा सर्वांगीण विकासासाठीच आम आदमी पार्टी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार*
अशा विविध कारणांमुळे व आमच्या कडे येणाऱ्या विविध प्रकारच्या तक्रारी मुळे आम्ही पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार आहोत तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच पंढरपूर नगरवासी यांना व्यापाऱ्यांना येणाऱ्या भाविक भक्तांना योग्य सेवा सुविधा पुरविण्यासाठी आम आदमी पार्टी नगरपालिका निवडणूक लढविणार अशी माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

*आम आदमी पार्टी संघटनात्मक काम वाढवणार सत्ता मिळवणे हा आम आदमी पार्टीचा हेतू नसून नागरी सुविधा योग्य पद्धतीने मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे पक्ष असून यासाठीच आम आदमी पार्टीची स्थापना झालेली आहे*

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील अनेक  प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी दिल्ली माॅडेल बघुन  आले असुन त्याप्रमाणेच पंढरपूर नगरपालिकेद्वारे शहराचा विकास  करण्याचा आमचा निर्धार आहे.यासाठी केंद्रीय व राज्य पदाधिकरी प्रयत्नशील आहेत. पंढरपूरचे नागरिक आम्हाला निश्चितच संधी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने मिळवून देण्यासाठी दिल्लीमध्ये मोहल्ला दवाखान्याची निर्मिती झाली आहे त्याच धर्तीवर पंढरपूरमध्ये लवकरच अशी योजना अमलात आणणार आहोत अशी माहिती एम.पाटील यांनी सांगितले*

यावेळी पत्रकार परिषद मध्ये जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ भोसले तालुका संघटक श्रीरंग बागल तालुका अध्यक्ष विश्वंभर काशीद जिल्हा युवा अध्यक्ष गगन गोडसे माढा तालुका अध्यक्ष सतीश लोंढे, बंडू मोरे, संभाजी गांडुळे, दत्ता भोसले आदी आम आदमी पार्टीचे कार्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close