पुरोगामी संघर्ष परिषदेचा महाड येथे महीला रोजगार मेळावा संपन्न

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महाड (जि.रायगड)येथील मेळाव्यात राज्य कार्याध्यक्षा सौ. अनामिका गडकरी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजेंद्र भिसे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
महाड (जि.रायगड) पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी जाहीर केल्याप्रमाणे महिला मेळाव्यांच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील व शासकीय योजनांचा कसा लाभ घ्यावा याचे मार्गदर्शन महाड (जिल्हा रायगड) येथे महिला मेळाव्यामध्ये महिला आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षा सौ. अनामिका गडकरी यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र भिसे यांनी करून महिलांनी इतरावर अवलंबून न राहता ताकतीने पुढे येऊन स्वतःचा घर बसल्या उद्योग निर्माण करावा असे आवाहन केले.
सदर मेळाव्यास 200 महिला बचत गटातील अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होत्या.