आजच्या महिलांनी उद्याचे शरदचंद्रजी पवार साहेब घडवावेत – महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण
पंढरपुरात पार पडला आदर्शमाता व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर–परिस्थिती नसतानाही अकरा मुलांना जन्म देऊन त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन करून त्यांना योग्य शिक्षण देऊन व संस्काराची शिदोरी त्यांच्यासोबत ठेवून ज्या पद्धतीने शारदाबाई पवार यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा नेता घडवला असेच उद्याचे युवक व सुसंस्कारित पवार साहेबांसारखे युवक घडवावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी केले.
अजित दादा पवार फाउंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील कर्तुत्वान मातांचा शारदाई पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपालीताई ठोंबरे-पाटील युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा सचिव प्रियदर्शनी ताई महाडिक सुनिताई रोटे लता ताई फुटाणे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले नगरसेवक मोहम्मद उस्ताद विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे आदी उपस्थित होते
या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील रंजना आवटे (लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या मातोश्री), सुवर्णालता रामदास भाजीभाकरे (जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे व पोलीस उपायुक्त संदिप भाजीभाकरे यांच्या मातोश्री), कमल गाढवे (मारूती गाढवे यांच्या मातोश्री), विद्या क्षीरसागर (मयुरा शिंदेकर असिस्टंट डायरेक्टर स्मार्ट सिटी यांच्या मातोश्री), श्रीमती लोकमुद्रा सुरेश पाटील (उमेश पाटील यांच्या मातोश्री), श्रीमती गोपाबाई साबळे (पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे यांच्या मातोश्री), मिनाक्षी सुभाष कदम (सुजीत कदम यांच्या मातोश्री), सुनंदा खांडेकर (जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांच्या मातोश्री), लक्ष्मी राठोड (पीएसआय विजय राठोड यांच्या मातोश्री), यमुना काळेल (महाराष्ट्र केसरी चंद्रहार निमगिरे यांच्या आत्या), पद्मीनी राऊत (लेखक अनिल राऊत यांच्या मातोश्री) यांच्यासह किर्ती नंदकिशोर भरडिया (वरळी सी लिंक ते गेट ऑफ इंडिया हे समुद्री 38 कि.मी.अंतर 7 तास 22 मि.पुर्ण करून विश्वविक्रम केल्याबद्दल), किरण नवगीरे (ता.माळशिरस आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळविल्याबद्दल), सिनेट सदस्य प्रा.डॉ.सुशिलकुमार शिंदे, बजरंग शितोळे, डॉ.समाधान माने, डॉ.आर्यन कांबळे (बी.ओ.एस.), ऍड.उषा पवार, डॉ.अमर कांबळे (आय.क्यू.एसी) व पंढरपूूरच्या शितल गुरव हिची क्रिकेट संघात नेट बाॅलर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रुपाली ताई ठोंबरे
म्हणाल्या की यापूर्वी माझा पक्ष वेगळा होता आता मला वर्ष झाला राष्ट्रवादीत प्रवेश केला पण माझ्यामते शरद पवार साहेब स्व.बाळासाहेब ठाकरे स्व गोपीनाथ मुंडे राज ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले कोहीनूर हिरे आहेत असे सांगितले.
उमेश पाटील म्हणाले की आम्हा भावंडावर चांगल्याप्रकारे संस्कार करून आम्हाला घडविले आहे. आईमुळेच आमचे कुटूंब एकत्र आहे आईविषयी बोलेल तेवढे कमीच आहे आपण माझ्या आईचा व सर्व मातांचा गौरव केला त्यामुळे मी श्रीकांत शिंदे यांचे कौतुक करतो श्रीकांतसारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्षाच्या राज्यपातळीच्या नेत्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आम्ही त्याची दखल घेवून ताकद देण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी सांगितले.
युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणताई सलगर , संदीप मांडवे यांनी मनोगत व्यक्त केले
सध्या सोशल मीडिया मुळे अनेक मुली फसल्या जातात अन चुकीचा रास्ता निवडतात त्यामुळे श्रद्धा सारखे प्रकार देशात घडतात म्हणून युवा समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले त्यांचे मुलांनो आई वडिलांना समजून घ्या या विषयावर व्याख्यान देत असताना संपूर्ण सभागृहात अश्रू अनावर झालेल्या मुली हायमोकलून अश्रूंना वाट करून देत होत्या
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी नगरसेवक मोहम्मद उस्ताद सुरज पेंडल सुरज कांबळे आकाश सिताफ विकी अभंगराव संतोष बंडगर दादा थिटे कॉलेजचे प्राध्यापक श्री मुळे आधी परिश्रम घेत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंकुश गाजरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी मानले


