Uncategorized
पंढरीत शिवसेनेने केले जोडेमारो आंदोलन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-शिवसेना उध्दव ठाकरे यांचे वतिने पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे बाबत अपशब्द वापरले म्हणून आ.रवी राणा यांचे प्रतिमेस जोडे मारो आंदोलन तहसील कार्यालय पंढरपुर येथे केले.यावेळी रवि राणाचा निषेध करण्यात आला.यापुढे पक्ष प्रमुख उध्दव ठकरे व पक्षाबाबत रवि राणा यांनी पातळी सोडून भाषा वापरली तर अमरावतीमध्ये जाऊन गाढवावरुन धिंड काढून जोडे मारले जातील असा इशारा तालुका प्रमुख संजय घोडके यांनी दिला. यावेळी काका बुरांडे, अनिल कसबे,श्रीनिवास उपळकर याचेसह तालुक्यातुन अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.