विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र समजून घेतले तर त्यांच्यातील अंधश्रद्धेच्या बाबत अनेक समस्यांची उत्तरे मिळू शकतील.” — डॉ. नितीन शिंदे
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात विज्ञान मंडळ आणि नेचर क्लबचे उद्घाटन संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक श्रीकांत कसबे
पंढरपूर – “सृष्टी चक्र ही नैसर्गिक प्रक्रिया त्याचे शास्त्र माणसांनी
समजून घेतले पाहिजे. सूर्यमाला हा आकाशगंगेच भाग असून सूर्यमालेत असंख्य ग्रह असतात. चुंबकीय शक्तीच्या बलाने सूर्यमाला कार्यरत असते. याचे विज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. समाजात खगोलशास्त्राच्या आधारे पंचांग , कालसर्पयोग, साडेसाती अशा बऱ्याच बाबी सांगितल्या जातात. विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र समजून घेतले तर त्यांच्यातील अंधश्रद्धेच्या बाबत अनेक समस्यांची उत्तरे त्यांना मिळू शकतील.” असे प्रतिपादन इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी केले.
‘रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने विज्ञान मंडळ आणि नेचर क्लबचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.’
डॉ. नितीन शिंदे पुढे म्हणाले की, “माणूसाचे निसर्गाप्रति असणारे नाते हे आत्मीयतेचे असले पाहिजे. माणूस जीवनात सुखाचा शोध घेत असतो. निसर्गाशी तो स्पर्धा करून हे सुख घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र निसर्गाला विरोध करून नव्हे तर निसर्गाशी प्रेमाचे नाते निर्माण करून त्याला सुख प्राप्त करता येते. सुखाच्या सोबत आनंद , प्रेम, माया, जिव्हाळा या बाबी
निसर्गाकडून माणसाला सहज उपलब्ध होवू शकतात. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभण्यासाठी निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. निसर्ग वगळून माणूस जगूच शकत नाही. त्यामुळे निसर्गाच्या सहवासात माणूस सुखी आणि समाधानी होवू शकतो.”या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “माणूस हा निसर्गाचे आपत्त्य आहे. याची जाणीव माणसाने कायम ठेवून निसर्गाशी वर्तन केले पाहिजे. निसर्ग वाचविला तरच माणूस वाचेल. अन्यथा माणसाचे आयुष्य भकास होवू शकते. निसर्गातील झाडे, झुडपे, वेली, नदी, नाले, किनारे, झरे माणसाला पाने, फुले, फळे, सावली, लाकूड याबरोबरच अनेक औषधी घटक देते. माणसाची भूक भागवून त्यास सुखी करण्याची ताकद निसर्गात आहे. त्यासाठी माणसांनी नेचर क्लबच्या माध्यमातून निसर्गाचे संगोपन केले पाहिजे तरच आपले संगोपन होईल.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इलेक्ट्रोनिक्स विभागाचे प्रमुख प्रा.
अप्पासाहेब पाटील यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर विभागातील विज्ञान विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुमय्या पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. नवनाथ पिसे आणि सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. प्रियांका बनकर यांनी मानले.
……………………………………………………………………….