निवाऱ्यासाठी गायरानामध्येअतिक्रमण केलेल्या भूमीहिनांसाठी टोकाची लढाई– सौ.सुनिता खटावकर

सौ.सुनिता खटावकर
राज्य उपाध्यक्षा
पुरोगामी संघर्ष परिषद
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:- माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरानातील अतिक्रमणे निष्काशीत करण्यासाठी राज्य शासनाने निर्देश दिले असले तरी माननीय उच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो याचा अर्थ असा नाही सगळंच कायद्याने केले पाहिजे काही ठिकाणी परिस्थिती बघून कायदा आणि व्यवहार याची सांगड घातली पाहिजे हा मुद्दा लक्षात घेऊन “गावात घर नाही, रानात शेत नाही” अशा गरीब आणि गरजू लोकांनीच गायरानावर निवार्यासाठी अतिक्रमण केल्याचे खात्री करून मायबाप शासनाला आमची विनंती आहे ज्या भूमीहीनांनी फक्त निवाऱ्यासाठीच गायरानात अतिक्रमण केलेले आहे यांच्यासाठी शासनाने माननीय उच्चा न्यायालयांस फेरविचार करण्याची याचिका दाखल करावी व या गोरगरिबांचे संसार उघड्यावर येऊ नयेत याची काळजी घ्यावी अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद भूमी हिनांचे गायरानावरील अतिक्रमणाचे बाबतीत टोकाचा संघर्ष करून न्यायालयीन टोकाची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष सौ.सुनीता खातावकर यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे बोलताना सौ. खटावकर म्हणाल्या की, ज्या, ज्या भूमीहीनांनी निवाऱ्यासाठी गायकानांमध्ये अतिक्रमण केलेले आहे अशा लोकांनी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे ताबडतोब आपली नावे नोंद करावीत व भूमीन असल्याचा दाखला काढून ठेवावा.