Uncategorized

महेश उमाप मृत्युप्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्या अधिकार्यावर कारवाई करा-राजाभाई सुर्यवंशी

.अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे त्यांचे कुटुंब उपोषणास बसणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

महेश उमाप यांची आत्महत्या नसुन हत्याच असल्याने संशयीत आरोपीची सखोल चौकशी व्हावी यासाठी हे प्रकरण सिआयडी कडे सोपवावे अशी केली मागणी
पंढरपुर:- पळसखेड तालुका बीड येथील महेश साहेब उमाप या तरुणाचा१३नोव्हेंबर रोजी संशयीत मृत्यु झाला होता. त्यावेळी सदर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे मयताचे भावास कळविले.फोटो बघीतले असता व प्रसंग पहाता मयताचे वडील व भाऊ दिनेश यांना हि हत्याच असल्याचा संशय आला.संशयीत आरोपी योगेश अशोक दांडगे व बिभीषन राजाराम सुरवसे यांनी वरील दोघांना प्रकरण वाढवू नये म्हणून दमदाटी केली. पैसे घेऊन मिटवा असा दबाव आणला . पंढरपुर तालुका पोलिस स्टेशन मध्ये हे दोघे फिर्याद देण्यास गेले असता पोलिसानी गुन्हा दाखल न करता फिर्यादीस हुसकावून लावले .हे मृत्युप्रकरण दडपण्याचा प्रयत्न या अधिकार्यानी केला असुन या अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजाभाई सुर्यवंशी राज्याध्यक्ष मास संघटना मुंबई यांनी पंढरपुर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
पुढे ते म्हणाले की, मटका प्रकरणातील मोठ्या घबाडातुनच महेश यांचा आरोपीने खुन केला असावा व प्रकरण दडपण्याच्या हेतूने या प्रकरणातील आरोपीनी या खुनाला आत्महत्या चे स्वरुप दिले .या प्रकरणातील पोलिस कर्मचारी यांनी १३ तारखेच्या प्रकरणाचा गुन्हा २७तारखेस नोंदवुन ही आत्महत्याच आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला असुन त्यांची भूमिका संशयास्पद आहे.फिर्यादीस शिविगाळ करणे ,एफ आय आर नोंदविण्यास विरोध करणे. एफ आय आर.फिर्यादी सांगेल तसा न नोदविणे,मयत अनुसुचित जातिचा आहे हे माहीत असुन हि अँट्रासिटी दाखल न करणे,आरोपींना त्वरीत अटक न करणे,आरोपी ताब्यात घेऊन सोडणे,जेवणाचा डब्बा पुरविणे असे प्रकार घडले.या प्रकरणात आम्ही लक्ष घातल्याने फिर्याद दाखल होऊन फिर्यादी  वरील ताण कमी झाला.दिलीप तायडे,समाधान वायदंडे,, भगवान वैरागर,संजीव खिलारे,अंबादास वायदंडे,अंकुश शेंबडे,अशोक अल्हाट व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक दबाव आणुन पोलिस प्रशासनास जाब विचारल्या मुळे संबधीत आरोपीस अटक झाली असुन अँट्रासिटीचे कलम लावले आहे.अन्यथा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु झाला होता.

आणखी माहिती देताना सुर्यवंशी म्हणाले की,कर्तव्यात कसुर केल्या बद्दल या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचेवर सह आरोपी करुन गुन्हा दाखल करावा, दिनांक १३व ३०नोव्हेंबर आरोपीचे मोबाइल चे सी.डी.आर काढण्यात यावे. विशेष बाब म्हणून पिडीत कुटुंबाला २५लाख निधी मिळावा ,मटका प्रकरणावरुन हे प्रकरण घडले असलेने व यात मोठे रँकेट असल्याने हि केस सिआयडी कडे वर्ग करावी अशी आमची मागणी असुन उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असुन आमची मागणी मान्य नाही झाली तर त्यांचे कुटंब आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसणार आहे. या पिडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मास संघटना पाठपुरावा करेल असे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत दलितमित्र नानासाहेब वाघमारे, डीपीआयचे जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुश शेंबडे,शहराध्यक्ष राजू शिंदे,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय अडगळे,बहुजन रयत परिषद शहराध्यक्ष व डेमोक्रेटिक कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अँड किशोर खिलारे, दीपक लावंड,प्रदेशाध्यक्ष महादेव कोळी क्रांतीसेना,   संतोष मगर जिल्हाध्यक्ष मानवाधिकार संघटना,   अमोलदादा भोसले,तालुकाध्यक्ष  क्रांतीकारी संघर्ष संघटना इंदापुर,     मयत महेश उमाप चे वडील साहेबराव उमाप, भाऊ दिनेश उमाप ,गणेश भोसले  टेंभुर्णी, आदी  उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close