Uncategorized
पंढरपूर तालुका विधी सेवा समिती तर्फे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिर संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर(प्रतिनिधी):आज रविवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी तालुका विधी सेवा समिती पंढरपुर व अंबिका योग कुटीर, ठाणे शाखा पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर श्री एम. बी. लंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष यांनी आपल्या जीवनामध्ये योग, आसन यांचे महत्त्व समजावून दिले आणि कायदेविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये अंबिका योग कुटीर शाखा पंढरपूर मधील अधिकारी व सदस्यांनी योगाबद्दल माहिती करून दिली तसेच प्रत्यक्षात काही योग प्राणायाम करून दाखवले.
सदर कार्यक्रमास विधी स्वयंसेवक यारगट्टीकर, वाघमारे, भोसले तसेच अंबिका योग कुटीर चे बरडे सर व त्यांचे सहकारी सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.