पुरोगामी संघर्ष परिषदेचा महिलांसाठी गाव तेथे उद्योजक शाळा उपक्रम

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने महिलांच्यासाठी गाव तेथे उद्योजक शाळा या उपक्रमात मार्गदर्शन करताना सौ. जयश्री सावंत, अनामिका गडकरी व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मुंबई-( अंधेरी साकीनाका)*- केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या महिलांच्यासाठी उद्योग उभा करण्याच्या अनेक योजना असून त्या महिलांच्या पर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करून अशा योजनांची माहिती करून महिलांना उद्योजक बनवून स्वावलंबी करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने महिलांच्यासाठी गाव तेथे उद्योजक शाळा हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा सौ. जयश्री सावंत यांनी सांगून त्याची सुरुवात मुंबई अंधेरी येथील साकीनाका या ठिकाणाी करण्यात आली.
या राज्यव्यापी महिलांच्यासाठी असलेल्या कार्यक्रमाची माहिती सांगताना जयश्री सावंत म्हणाल्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे या हेतूने हे काम सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा सौ.अनामिका गडकरी म्हणाल्या खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून सरकारी योजना आर्थिक, शैक्षणिक व उद्योजकांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सदर उद्योजक शाळा महत्त्वाच्या असून तळागाळातील महिलांना माहिती देण्यात येईल.
सदर उद्योग शाळेस मुंबई ,घाटकोपर, अंधेरी, दक्षिण व पश्चिम मुंबई इथून अनेक महिला उपस्थित होत्या.
पुढे बोलताना अनामिका गडकरी म्हणाल्या, लवकरच पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून राज्यभर रोजगार मेळावा घेऊन महिलांना व पुरुषांना नवीन उद्योग उभारून उद्योजक घडवून त्यांना आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मजबूत करणे या संकल्पनेने काम केले जाईल.
उद्योजकांची शाळा या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यक्रमास स्कायझोन इन्स्टिट्यूट व जयश्री संस्था यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.