Uncategorized

युटोपियन शुगर्स च्या ९ व्या व गळीत हंगाम २०२२-२३ चा शुभारंभ

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील ऊसास देणार २०० रु, कामगारांना १२.५०% दिवाळी बोनस तर चालू गळीत हंगामात ७.५१ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट एफआरपी पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम . चेअरमन उमेश परिचारक यांची महत्वपूर्ण घोषणा.

फोटो ओळी :- युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या गळीत हंगाम २०२२-२०२३ या ९ व्या गळीत हंगामा चा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक यांच्या शुभ हस्ते गव्हाणीत मोळी टाकून सदर प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी,ऊस उत्पादक,तोडणी मजूर, वाहतूक, ठेकेदार आदी दिसत आहेत

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

मंगळवेढा प्रतींनिधी :- युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याकडे मागील गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रती मे.टन २०० रु.प्रमाणे ऊस दर देणार असून कर्मचारी बांधवांचे कारखाना उभारणीत योगदान महत्वाचे असते. त्यांची दिवाळी ही गोड व्हावी या करीता त्यांना ही १२.५० टक्के दिवाळी बोनस देणार आहे. एफआरपी पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम राखत असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी केली आहे.

युटोपियन शुगर्स च्या ९ व्या व गळीत हंगाम २०२२-२३ चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक यांचे समवेत सर्व खाते प्रमुख,कर्मचारी व कामगार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, कारखाना ९ व्या गळीत हंगामास पूर्ण क्षमतेने सामोरे जात आहे. मागील वर्षी युटोपियन ने उच्चांकी गाळप केले होते.चालू वर्षी कारखान्याने विस्तारीकरण करून प्रतिदिनं ५२०० मे.टन गाळप करण्याचा मानस ठेवला आहे.सर्व यंत्रणा अद्यावत करण्यात आली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे चालू गळीत हंगाम ८ -१० दिवस उशिराने चालू होत आहे. खरीपाची पिके पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याप्रमाणात सततच्या पावसामुळे ऊस उत्पादक वर्गाचे नुकसान कमी आहे. हंगामाच्या सुरूवातीला जास्तीचा पाऊस झाल्याने रिकव्हरी कमी लागत असते. तरी सुद्धा चालू गळीत हंगाममध्ये मागील सर्व गाळपाचे रेकॉर्ड मोडीत काढून नवा उच्चांक प्रस्थापित करण्याचा आमचा मानस असून चालू गळीत हंगामा करीता ७ लाख ५१ हजार मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. तसेच केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या इथेनॉल बेल्ण्डींग कार्यक्रमा मध्ये आपल्या कारखान्याने सहभाग घेतलेला आहे. चालू गळीत हंगामा मध्ये प्रतीदिन ६० हजार लिटर इथेनॉल उत्पादन करण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त करतानाच मागील गळीत हंगामा मध्ये गाळपास आलेल्या ऊसास प्रती मे.टन २०० रु.प्रमाणे दिवाळी भेट म्हणून देणार आहे. कारखान्याने या पूर्वीच २१०० रु प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक यांना अदा केलेली आहे. कारखान्याची एकूण एफआरपी ही २१८० रु. आहे . त्यामुळे मागील गळीत हंगाम मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे.टन १२० रु. इतका दर हा एफआरपी पेक्षा जास्तीचा दर होत आहे. या मुळे कारखान्याने एफआरपी पेक्षा जास्तीचा दर देण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. तसेच कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी कामगार वर्गाची भूमिका महत्वाची असते. त्यांची ही दिवाळी गोड व्हावी या करीता १२.५०% दिवाळी बोनस देण्यात येणार  आहे. तसेच ऊस उत्पादक यांनाही दिवाळी करीता सवलतीच्या दरात युटोपियन च्या सर्व विभागीय कार्यालातून साखर वाटप करण्यात येणार असल्याचे ही परिचारक यांनी संगीतले.

सततच्या पावसामुळे अत्यंत साधेपणाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close