Uncategorized

“एक राखी सैनिकांसाठी” विवेक वर्धिनीचा अनोखा उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे एक राखी सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ ,सचिव ॲड. वैभव टोमके व सर्व संचालक मंडळांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रशालेमध्ये राबवण्यात आला.यामध्ये प्रशालेतील विद्यार्थिनींनी आपल्या देशासाठी अहोरात्र आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेता येत नाही हे लक्ष घेऊन त्यांच्यासाठी राख्या एकत्र करून त्या
नाईकनवरे कुटुंब व मित्रपरिवार फाउंडेशन च्या माध्यमातून सैनिका पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. हे फाउंडेशन दरवर्षी अशा प्रकारचे सामाजिक कार्य करून सैनिकापर्यंत राख्या पोहोचवण्याचे काम करीत आहे. यावेळी प्रशालेचे प्राचार्य यु. आर.मुंढे, पर्यवेक्षक सुनिल पाटील,क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे, ज्येष्ठ शिक्षक राजूभाई मुलाणी,संजय क्षीरसागर, सुनील विश्वासे, शिवाजी येडवे,अनिल सोनार, विजय कर्णेकर,तानाजी चोपडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या श्रीमती सुनंदा नाईक नवरे, दीपक नाईक नवरे नगरसेवक कृष्णा वाघमारे शैलेश आगवणे सुधीर रणदिवे हे उपस्थित होते. अशाप्रकारे विवेकवर्धिनीच्या विद्यार्थिनींनी देशासाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या सैनिका प्रती जोपासलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close