पुरोगामी संघर्ष परिषदेचा मिणचे ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
मिणचे:-(ता.हातकणंगले)- ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या पंधरा टक्के रक्कम ही मागासवर्गीयांच्या विकासावर खर्च करायची असताना मिणचे ग्रामपंचायतीने मात्र याला पूर्णपणे बगल देऊन जी कामे झाली नाही ती कामे दाखवून मागासवर्गीयांचा विकास झाला अशा अविर्भावात मागासवर्गीयनाना विकासापासून दूर ठेवल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेने आक्रमक भूमिका घेत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून व प्रत्यक्ष मागासवर्गीयांच्या वस्तीमध्ये जाऊन सर्वच कामांची पोलखोल केल्यामुळे बोगसगिरी उघडकीस आली. त्यामुळे मिणचे (तालुका हातकणंगले) ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढून सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन समोरासमोर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी इथून पुढे कुठलेही काम मागे राखले जाणार नसल्याची कबुली दिल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेचे हे आंदोलन यशस्वी ठरले आहे.
पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसाभाई मुल्ला यांचे नेतृत्वाखाली सदर मोर्चा निघाला व ग्रामपंचायतीसमोर गेल्यानंतर सभेत रुपांतर झाले यावेळी मुसाभाई मुल्ला राजेंद्र घाटगे, गणेश घाटगे यांनी मोर्चास मार्गदर्शन केले.
सदर मोर्चास पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस खंडू कांबळे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, कोल्हापूर जिल्हा सचिव गणेश घाटगे, कोल्हापूर जिल्हा महासचिव जनार्दन घाटगे, कोल्हापूर जिल्हा संघटक प्रशांत जाधव ,हातकणंगले तालुका अध्यक्ष रवींद्र हंकारे, हातकणंगले तालुका संपर्कप्रमुख दौलत घाटगे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घाटगे , रविराज घाटगे, बाजीराव घाटगे, कृष्णा घाटगे , रविराज घाटगे ,बाजीराव घाटगे, कृष्णा घाटगे, रविराज घाटगे ,बाजीराव घाटगे, कृष्णा घाटगे, गणेश घाटगे, अभिजीत घाटगे, अनिल घाटगे, भगवान वायदंडे ,धनंजय घाटगे, ओंकार घाटगे, शरद घाटगे, पारस घाटगे, बादल घाटगे ,बजरंग घाटगे, सुरेश घाटगे, आकाश घाटगे, राज घाटगे, स्वप्निल घाटगे, हर्षद घाटगे, करण घाटगे,राज हंकारे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.