स्वातंत्र्यदिनी पंढरपूरकर रसिक प्रेक्षकांना संगीताची सुरेल मेजवानी.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी) भारताच्या स्वातंत्रदिनी मंगळवार दि.१५ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथील संगीतप्रेमी रसिकासाठी पंढरपूर पोलिस मित्र परिवार व, आखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा पंढरपूर, स्वरांजली ऑर्केस्ट्रा, यांच्या वतीने पंढरपूर मधील रखुमाई सभागृह येथे सायंकाळी ७ वा. जुन्या,नव्या, मध्य काळातील गाजलेल्या, लोकप्रिय कर्णमधुर गीतांची मेजवानी मिळणार आहे.
स्वर्गीय मोहम्मद रफी, संगीतकार आर डी बर्मन,किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्मृिदिनानिमित्त या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तब्बल २२कलाकारांचा वाद्यवृंद आपली कला सादर करणार आहेत.
पंढरपूर शहर हे कलाप्रेमी, जाणकार रसिकांचे गाव आहे. अनेक कलाकार,गायक, संगीतकार, चित्रकार या शहरातून लोकप्रिय झाले,गणेशोत्सव , नवरात्र उत्सव या सणासुदीच्या काळात पंढरपूर येथे विविध कार्यक्रम होत असत.
मात्र मागील तीन वर्षात कोरोना आणि लॉकडाऊन असल्याने मोठ्या प्रमाणात संगीताचे कार्यक्रम झाले नव्हते,
लता मंगेशकर, मोहम्मद रफी किशोरकुमार यांचा जादुई आवाज आणि आर डी बर्मन यांचे जबरदस्त संगीत असे समीकरण जुळून येणे म्हणजे दुग्धशर्करा योग,
पंढरीतील गायक, वादक संगीतकार गणेश गोडबोले हे कलाप्रेमी जाणकार असून पंढरी तील नवीन, होतकरू कलाकारांना संगीताचे व्यासपीठ ते उपलब्ध करून देतात.
या संगीत मेजवानीस सर्व संगीतप्रेमी प्रेक्षकांनी जरूर यावे, सदर कार्यक्रम मोफत ठेवण्यात आला असून सर्वांना प्रवेश खुला आहे. असे आवाहन गोडबोले यांनी केले आहे.




