पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिणचेच्या सरपंचांना निवेदन
पाच वर्षातील दलित वस्ती सुधार योजनेचा मागीतला हिशेब

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिनचे तालुका हातकणंगले च्या सरपंच रंजना जाधव यांना निवेदन देताना मुसाभाई मुल्ला शिवाजी घाटगे, दौलत घाटगे ,जनार्दन घाटगे व इतर
मिणचे:- (ता.हातकणंगले)- हातकणंगले तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिनचे गावच्या गेल्या पाच वर्षातील दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा हिशोब, झालेल्या कामाचे नाव, कामाचे ठिकाण ,एकूण आलेला निधी, खर्च निधी व शिल्लक निधी अशी सर्व माहिती सरपंच सौ. रंजना अशोक जाधव यांना दिलेल्या निवेदनात मागण्यात आली असून सदर माहिती चार दिवसाचे आत न दिल्यास दलित निधीचा गैरवापर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करून, ग्रामपंचायत कार्यालय व हातकणंगले तालुका पंचायत समितीचे बिडिओ यांचे कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत चव्हाण, जिल्हा सचिव गणेश घाटगे, जिल्हा महासचिव जनार्दन घाटगे ,हातकणंगले तालुका अध्यक्ष रवींद्र हंकारे तालुका कार्याध्यक्ष शिवाजी घाटगे, तालुका संपर्कप्रमुख दौलत घाटगे, कुमार घाटगे ,बाजीराव घाटगे ,रोहित हंकारे, दाविद घाटगे, संजय घाटगे, राजेंद्र घाटगे, बजरंग हटके गोरख घाटगे सुनील घाटगे, राजेंद्र घाटगे, आकाश वायदंडे, सचिन घाटगे, आकाश घाटगे, संजय घाटगे, संजय वायदंडे,रविराज घाटगे, अभिजीत घाटगे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिनचे तालुका हातकणंगले च्या सरपंच रंजना जाधव यांना निवेदन देताना मुसाभाई मुल्ला शिवाजी घाटगे, दौलत घाटगे ,जनार्दन घाटगे व इतर



