लसाकम ‘ च्या लातूर तालूका सचिव पदी दत्ता कांबळे यांची नियुक्ती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
लातूर – येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघ (लसाकम ) या परिवर्तनवादी सामाजिक संघटनेच्या लातूर तालूका शाखेच्या सचिवपदी दत्ता रामराव कांबळे यांची नियुक्ती झाली असून ‘ लसाकम ‘ चे नियंत्रक नरसिंग घोडके यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
‘लसाकम ‘ चे जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रामध्ये संघटनेच्या वृध्दीसाठी आणि परिवर्तनवादी विचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी ही निवड झाल्याचे नमूद करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी नूतन सचिवांना शुभेच्छा देताना नरसिंग घोडके म्हणाले की, व्यवस्था परिवर्तन हे ध्येय घेऊन उदयास आलेल्या ‘ लसाकम ‘ या संघटनेचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या प्रत्येकांने देणारे बनले पहिजेत. ‘लसाकम ‘ हे देणाऱ्या आणि बुध्दीजीवी – इमानदार लोकांचे संघटन आहे. मागणारे लोक या संघटनेत टिकू शकत नाहीत. संघटनेवरील निष्ठा आणि वैचारिक बांधिलकी ज्यांच्याकडे असते तीच माणसे आपल्या पदाला न्याय देऊ शकतात. हे सर्वांनी ध्यानात ठेवावे असे निक्षून सांगीतले. यावेळी ‘ लसाकम ‘ महासचिव राजकुमार नामवाड , शिरीष दिवेकर, संजय दोरवे यांचीही शुभेच्छा देणारी भाषणे झाली.
शिरीष दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. ‘ लसाकम ‘ चे जिल्हा सचिव मधुकर दुवे यांनी संचलन केले. नूतन सचिव दत्ता कांबळे यांनी सत्काराला उत्तर दिले तर संजय सुर्यवंशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते नारायण कांबळे, शिवाजी अवघडे, तालूकाध्यक्ष राजेश तोगरे, राजेंद्र हजारे, ज्ञानोबा सुर्यवंशी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.