Uncategorized

भावी पिढीसाठी महापुरुषांचे विचार प्रेरणादायी-  पोलिस उप अधिक्षक विक्रम कदम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंंढरपूर:-देशाचे भवितव्य आणि समाज घडवायचा असेल तर महापुरुषांचे विचार समाजाच्या जडणघडणीसाठी प्रेरणादायक आहेत असे बहुमोल विचार उपविभागीय पोलीस अधिक्षक विक्रम कदम  यांनी मांडले.ते शेवते ता- पंढरपूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये बोलत होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे लेखन आणि साहित्य प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचले पाहिजे. कार्यक्रमाचे व्याख्याते सुनिल अडगळे यांनी ‘पुस्तक वाचले तरच मस्तक घडणार आहे’असे सांगून महापुरुषांच्या विचारांचे आचरण करून समाज विकासाला दिशा देणाऱ्या विविध उपक्रमांनी सर्व महापुरुषांच्या जयंत्या सर्वांनी मिळून साजऱ्या कराव्यात असा संदेश दिला.
यावेळी विविध स्तरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बिभीषण रणदिवे, सचिन शिंदे अंबादास वायदंडे, योगिता अडगळे,मच्छिंद्र जाधव, कोमल पाटोळे, गणेश मोहरे ,अनिल कोळवले,अशोक पाटोळे, विजया गायकवाड, बाळासाहेब हेगडे आदी गुणवंतांना “साहित्यरत्न गुणगौरव पुरस्कार 2022” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब माळी, विठ्ठलची माजी संचालक दशरथ खळगे ,सोसायटीचे माजी चेअरमन सोपान पाटील, पं.स.माजी सदस्य तात्यासाहेब पाटील,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची तज्ञ संचालक अशोकनाना तोडले, ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक खळगे, सरपंच सुरेखा तूपसौंदर,नाना कसबे ,उपसरपंच विकास उलभगत ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक खळगे,ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील,शेषराव कोळवले, नामदेव गुगले, तसेच सुधीर मस्के तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, शेवते गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक बहुजन क्रांती महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तुपसौंदर यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close