*पुरोगामी संघर्ष परिषदेने दलित वस्ती सुधार योजनेचा विचारला जाब*

फोटो ओळ
पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने म्होप्रे(ता.कराड) येथील सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष किशोर साठे व पुरोगामी संघर्ष परिषदेचे शिष्टमंडळ
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा न्युज:(सागर पाटील) म्होप्रे (तालुका कराड) पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सातारा जिल्ह्याचे युवक आघाडीचे अध्यक्ष माननीय किशोर साठे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने म्होप्रे गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन इसवी सन २०१६ ते इसवी सन २०२१ या कालावधीत म्होप्रे या गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीच्या १५टक्के निधी कोणत्या ठिकाणी कोणत्या कामासाठी व कधी वापरला हे जाहीर करावे अशी मागणी केली आहे सदर कामाचे स्वरूप व काम जर जाहीर नाही झाले तर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत जो भ्रष्टाचार झालेला असेल तो पुरोगामी संघर्ष परिषद चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही जिल्हाध्यक्ष किशोर साठे यांनी यावेळी दिला.
सदर शिष्टमंडळात रोहित कांबळे , सचिन साठे महिला व पुरुष असे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.