डॉ राजश्रीताई अनिल क्षीरसागर यांची शिवसेना (ठाकरे ) प्रणित शिव आरोग्य सेना महिला जिल्हाध्यक्ष सोलापूर पदी निवड
होळे येथे ग्रामस्थांचे वतीने नागरी सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-डॉ राजश्रीताई अनिल क्षीरसागर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित शिव आरोग्य सेना महिला जिल्हाध्यक्ष सोलापूर (डॉक्टर सेल) पदी निवड झालेबद्दल होळे ता.पंढरपूर ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ शनिवार दि १५/०४/२०२३ शिवआरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ अजित पाटील कोल्हापूर यांच्या वतीने संपन्न झाला.यावेळी शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक दिपक सुर्वे शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख संजय घोडके शिवआरोग्य सेनेचे तालुका समन्वयक गौसापाक आतार,महेश कांबळे,युवासेनेचे जिल्हा समन्वयक फिरोज तांबोळी,शिवसेना उपतालुका प्रमुख विलास चव्हाण युवासेना उपतालुका प्रमुख समाधान गोरे जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे युवासेनेचे प्रणित पवार उपतालुका युवा अधिकारी,विभाग प्रमुख उमेश बापू काळे सुस्ते गावचे सरपंच सालविठ्ठल,खरातवाडीचे सरपंच बळीराम देवकते,उपसरपंच ज्योतिराम सावंत उपस्थित होते तसेच यावेळी उषाताई कोळी राजश्री मिसाळ व सौ धोगे ताई पंढरपूर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला तसेच यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या राजश्रीताईंच्या निवडीमुळे सोलापूर शिवसेनेला एक अभ्यासू महिला जिल्हाप्रमुख मिळाल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे.