सवाते ( फ्रेंच किक बॉक्सिंग ) राज्य पंच कमिटी सदस्य पदी सुहेल हाबीब मुलाणी यांची नियुक्ती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
आटपाडी दि .१३ (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय सवाते महासंघ ( फिसाव) व सवाते असोसिएशन ऑफ इंडिया ( साई) सलग्न असलेल्या अम्युच्यर सवाते असोसिएशन –महाराष्ट्र अधिकृत सवाते राज्य संघटनेच्या वार्षिक सभेत सन २०२१-२३ यासालाकरिता सवाते राज्य पंच कमिटीची मध्ये राज्य संघटना सवाते राज्य पंच कमिटी मध्ये चेअरमन कुंदन डोईफोडे ( पुणे) तर सदस्य सुहेल मुलाणी (सांगली), अप्पासाहेब चिंचकर ( सोलापूर) व दुर्गराज रामटेके ( चंद्रपूर) यांची नियुक्तीची घोषणा पत्राद्वारे केली आहे.
सुहेल मुलाणी हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावाचे सुपत्र असून सवाते राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेते खेळाडू असून तायक्वांदो , ड्युअल खेळाचे ब्लॅक बेल्ट धारक असून सवाते खेळामध्ये राष्ट्रीय पंच असून आटपाडी ,खानापूर तालुक्यात व आसपास मुला- मुलांना तायक्वांदो , ड्युअल व सवाते खेळाचे मार्गदर्शन करून शेकडो राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे कार्य करीत आहेत.सुहेल मुलाणी यांना डॉ, हाबीब मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले. सुहेल मुलाणी यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असून संघटनेचे राज्यध्यक्ष श्याम राक्षे यांनी विशेष शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.