अखिल भारतीय मातंग संघ कल्याण शहर च्या वतीने मोठ्या जल्लोषात अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कल्याण (प्रतिनिधि) 1ऑगष्ट 2022 सोमवार रोजी आण्णाभाउ साठे यांची 102 वी जयंती अखिल भारतीय मातंग संघ शाखा कल्याण च्या वतीने कल्याण शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र च्या टिमला निमंत्रीत केले होते.
या प्रसंगी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली मनपाच्या सचिवासह ईतर अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी व समाजातील अधिकारी व कर्मचारी व समाज बांधव भगिनी सह अनेक संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनी प्रथम लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. अण्णा भाउ साठे यांच्या स्मारकाच्या कामात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत सर्व समाज बांधव आज एकञ उत्साही पणे सामील झाले होते.
(अध्यक्ष बंडु घोडे (सर),पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र)
तसेच शशांक बालविहार माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील सह विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षक-शिक्षिका कर्मचारी यांनी शाळेपासुन ते लालचौकी पर्यंत रॅली काढण्यात आली रॅलीत अण्णा भाऊ साठे यांच्या विविध घोषणांनी व वाजंत्री नी सर्वांचे लक्ष वेधून घेत अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मनपा च्या सचिव अधिकारी यांनी पालिकेतर्फे स्मारकाच्या दुरुस्तीचे लोकार्पण केले व नंतर आयोजक सूर्यवंशी ग्रुप व कार्यक्रमाचे अध्यक्ष चक्रधर घुले अखिलं भारतिय मातंग संघ ,यांच्या सुचने नुसार जाहीर सभेस सुरुवात झाली.
मंचावर अखिल भारतीय मातंग संघाचे वरिष्ठ,जाणकार नेते मा.मधूकर गवळी साहेब, पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र चे संस्थापक -अध्यक्ष बंडु घोडे (सर),पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र महिला आघाडी च्या अध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत, महिला संघटक मंगल मोरे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायाताई कांबळे, देशपांडे सर,हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी चक्रधर घुले हे होते तर या प्रसंगी बोलताना समाजातील मुलांना शिक्षण देवून लहुजी साळवे, मुक्ता साळवे ,महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या शिक्षणासाठी केलेल्या विचार कार्याचे वाहक बनवून शिक्षित समाज निर्माण करा जुगार, दारु, मटन, मच्छी व ईतर खर्च कमी करुन मुलांच्या शिक्षणा वर खर्च करा तरच तुमचे कल्याण होईल शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे महापुरुषांनी ओळखले होते म्हणूनच त्यांनी शिक्षणावर काम केले वसंविधानात कायदेशीर शिक्षणाचा हक्क मिळवून दिला याचा फायदा घ्या स्वत: जरी अधिकारी साहेब बनने तुमच्या हातात नव्हते ,पण तुमच्या मुलांना कमिशनर,पि.एस.आय. तहसिलदार.,क्लेक्टर ,अधिकारी व साहेब बनवून त्या साहेबांची माय आणि बाप होणे तुमच्या हातात आहे. ते करा तर अण्णा भाऊंची जयंती केल्याचे चीज होईल.
अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र या व नियोजनबद्ध वर्षभर पाठपुरावा करत आंदोलन करा वेळ प्रसंगी संबंधीत शासन प्रशासनाला जाब विचारा स्मारकाची आठवण फक्त जयंती दिवशीच नको, कचरा वेचून, मोलमजुरी करून मुलांना शिक्षण देणा-यां माता पित्यांचे अभिनंदन, गवळी साहेब, व चक्रधर घुले साहेब यांच्या अध्यक्षते खाली एकत्र येवून त्यांना साथ देवून सामाजिक चळवळ गतिमान करूया असे मनोगत पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष बंडु घोडे सर यांनी व्यक्त केले. तर या प्रसंगी डॉ. सुषमा बसवंत यांनी महिलांना प्रबोधित केले तसेच वंचित च्या जिल्हाध्यक्षा मायाताई कांबळे, देशपांडे सर, दिपक थोरात, रवि घुले, गुलाब जगताप, ईत्यादीनी आपापले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोप चक्रधर घुले यांनी केला तर आभार रवि गवळी यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजु काउतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी अवंतिका खंडागळे, कल्पना घुले,सुशिला गवळी, व्दारका जगताप, रंगुबाई कांबळे, संजय घुले, बंडू कांबळे. संतोष नाडे,संजय कांबळे,दिलीप खंडागळे,मोहन गवळी,रेखा लाखे, अखिल भारतीय मातंग संघ व सुर्यवंशी ग्रुप यांनी परीश्रम घेतले.