वायफळे व नेहरूनगर येथील नागरिकांच्या प्रलंबितप्रश्नी उपोषण करणार–सौ.पुनम फाळके जिल्हाध्यक्षा (ग्रामीण)
तासगावच्या तहसीलदारांची उडवा उडवीची भाषा

सौ.पुनम फाळके जिल्हाध्यक्षा (ग्रामीण)
पुरोगामी संघर्ष परिषद
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
तासगाव:-पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली 30 जून रोजी वायफळे व नेहरूनगर येथील नागरिकांच्या प्रलंबितप्रश्नी विराट मोर्चा काढलेला होता त्यावेळी दहा दिवसात सदर समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन देणाऱ्या तहसीलदारांची आज सोमवार 11 जुलै रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ पुनम फाळके यांनी महिलांच्या शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेटीत जी चर्चा झाली त्यामध्ये तहसीलदारांनी सरळ सरळ हात वर केले व हा प्रश्न चार महिन्यांमध्ये काय मार्गी लागेल असे वाटत नाही अशी उडवा उडवीची उत्तरे दिल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी मोर्चाला संबोधित करताना दहा दिवसात जर ठोस निर्णय नाही घेतला तर आमच्या महिला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा दिला होता तो इशारा आम्ही आदेश मानून येत्या चार दिवसात तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ. पुनम फाळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे वायफळे आणि नेहरूनगर प्रश्नी ही आरपारची लढाई असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा निर्णय घ्यावा लागला असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे.