विठ्ठल कारखाना निवडणूक अभिजीत पाटील गटाचे २०उमेदवार विजयी
आभार सभेत दिले परिचारकांना चितपट करण्याचे आव्हान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूकीचा निकाल जाहिर झाला असुन विद्यमान चेअरमन भगिरथ भालके यांचे पँनल विरोधात डीव्हीपी चे सर्वेसर्वा धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे पँनल व विद्यमान संचालक युवराज पाटील यांचे पँनल अशी तिरंगी लढत झाली होती. या निव
डणुकिचा निकाल जाहिर झाला असुन अभिजीत पाटील गटाचे २१पैकी २०उमेदवार विजयी झाले असुन ईतर दोन गटाचा दारुण पराभव झाला आहे.
विजयी मिरवणूक डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आल्यानंतर अभिजीत पाटील यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. व कार्यकर्त्याना संबोधीत करताना ते म्हणाले की,हि निवडणुक आपण जिंकलीती सभासदाच्या भरोश्यावर त्यामुळे ,सभासदांनी जो विश्वास दाखविला त्याला तडा जाऊ देणार नाही. कारखाना जोमाने चालवून पुन्हा”विठ्ठल”ला गतवैभव प्राप्त करुअसा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”विठल “च्या निवडणूकीत माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी कधीही हस्तक्षेप केला नव्हता परंतू प्रशांतराव परिचारक यांनी हस्तक्षेप केला. याच ठिकाणी समाधान आवताडे विजयी झाले वर त्यांनी दंड थोपटले होते मी भारतनानाचा पठ्ठा म्हणून जाहिर आव्हान देत आहे की, येणार्या काळात परिचारक यांना चितपट केल्याशिवाय रहाणार नाही. “विठ्ठल”परिवार एकत्र आणणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी विजयासाठी मतदार ,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केले त्यांचे त्यांनी आभार मानले.