श्री विठ्ठल कारखान्यावर कर्मवीर औदुंबर आण्णांची १००वी जयंती साजरी
औदुंबरआण्णा यांच्या जयंतीनिमित्त श्री विठ्ठल कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा पुरस्कार सोहळा कायम साजरा होणार:-चेअरमन अभिजीत पाटील.

आण्णांचे विचार घेऊनच सर्व सभासद व नागरिकांना न्याय देण्याची भूमिका कायम राहील :- चेअरमन अभिजीत पाटील.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
प्रतिनिधी वेणुनगर/- दि.२३- पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे संस्थापक चेअरमन व माजी आमदार कर्मवीर कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांची १०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपूर्वक पुजा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूरचे माजी प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ.जे.जी. जाधव सर, कारखान्याचे जेष्ठ सभासद मधुकर नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील, श्री विठ्ठल हॉस्पीटलचे सचिव अभिजीत राजाराम पाटील यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, रणजित राजाराम पाटील, अमरजित राजाराम पाटील व सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत सपन्न झाला.
याप्रसंगी आमदार रोहितदादा पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही आवर्जून उपस्थित राहून कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली…
कर्मवीर यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील म्हणाले की, कै. औदुंबर आण्णा पाटील व्यापारी दृष्टीकोण घेवून पंढरपूर तालुक्यात आले व त्यांना सर्वांच्या सहकाऱ्यांनीच विधानसभेत जाणेची संधी मिळाली व कै. यशवंतरावजी चव्हाण व शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचारातून कमी खर्चात श्री विठ्ठल कारखान्याची निर्मिती करुन पंढरपूर तालुक्यात कृषी व औद्योगिक क्रांती करुन दाखविली. कै. औदुंबर आण्णांनी अतिशय काटकसर करुन स्वभांडवलातून कारखान्याचे विस्तारीकरण करुन सातत्याने सोलापूर जिल्ह्यात एक नंबरचा व महाराष्ट्रात सहा नंबरचा दर देवून कारखान्यास वैभव प्राप्त करुन दिले. त्यांनी कै. आण्णांच्या जुन्या आठवणींना उजाळा देवून म्हणाले की, आम्हीही कै. औदुंबर आण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून कारखान्याचा कारभार करुन यापुढे सर्वात जास्त दर देणार असल्याचे त्यांनी सांगितले…
चालू हंगामामध्ये श्री विठ्ठल कारखान्याचे २२ दिवसात १,७५,६१५ मे.टन गाळप झाले असून या गळीत हंगामामध्ये १० लाख मे.टनाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकविलेला ऊस श्री विठ्ठल कारखान्यास देवून सहकार्य करणेचे आवाहन केले, आपले कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व ऊसाचे आम्ही गाळप करणार आहे, तसेच सभासद शेतकऱ्यांनी यावर्षी तुटलेला खोडवा ऊस ठेवून त्याची निडवा ऊस म्हणून कारखान्याकडे नोंद करुन पुढील २०२४-२५ गळीत हंगामामध्ये गळीतास दिल्यास या निडव्या ऊसास रुपये १००/- प्र.मे.टन जादा दर देणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
कर्मवीर कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांचे १०० व्या जयंतीनिमित्त कारखान्यामध्ये उत्पादानाशी निगडीत अखंड प्रामाणिकपणे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सेवकांचा प्रातिनिधीक स्वरुपात गुणगौरव सन्मान चिन्ह व मानधन देवून उपस्थितांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला व यापुढेही कै. आण्णांच्या जयंतीच्या वेळी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार म्हणून गौरव करणेत येईल, असे श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील यांनी सांगीतले.
या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूरचे माजी प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ.जे.जी. जाधव सर म्हणाले की, कर्मवीर कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे विचारातून रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात नावा रुपाला आली व कर्मवीर कै. औदुंबरआण्णा पाटील यांच्या विचाराने श्री विठ्ठल कारखान्यास महाराष्ट्रात वैभव प्राप्त झाले आणि अभिजीत पाटील या तरुण नेतृत्वाने कै. औदुंबर आण्णाच्या कारभाराचा आदर्श घेवून दोन वर्ष बंद पडलेला कारखाना चालू करुन श्री विठ्ठल कारखान्यास ते गतवैभव प्राप्त करुन देतील.
कै. औदुंबर आण्णांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की, संचालक, शेतकरी सभासद, कामगार हे संपूर्ण संस्थेचे विश्वस्त आहेत, आपण सर्वांनी कारखान्यावर प्रेम व निष्ठा ठेवून कामकाज करावे, चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना सहकार्य करावे, असे त्यांनी सर्वांना आवाहन केले.
सदर कार्यक्रमामध्ये शेतकरी संघटनेचे नेते व श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन शिंदे-पाटील, कारखान्याचे माजी संचालक प्रकाशआप्पा पाटील तिसंगी, माजी नगराध्यक्ष श्री सुभाष भोसले, कारखान्याचे जेष्ठ सभासद मधुकर नाईकनवरे, रणजित राजाराम पाटील, शशिकांत पाटील, प्रा. आप्पासाहेब पाटीलसर, प्रविण भोसले, औदुंबर शिंदे, कातीलाल गलांडे यांनी कै. औदुंबर आण्णा पाटील यांचे जुन्या आठवणींना उजाळा देवून आपली मनोगते व्यक्त केली व कारखान्याचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्केसर यांनी केले तर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सुत्रसंचलन चव्हाण सर यांनी केले.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के, धनाजी खरात, सचिन शिंदे-पाटील, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य व त्यांचा स्टाफ तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कर्मवीर औदुंबर (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली…