मातंग समाजाला फुले-शाहू आंबेडकर आण्णाभाऊ यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही–प्रा.सुकुमार कांबळे
डेमोक्रेटिक पार्टी (डीपीआय)चे पंढरपुरात चर्चा सत्र संपन्न नुतन पदाधिकारी यांची निवड जाहिर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सोलापुर जिल्हाध्यक्षअंबादास वायदंडे यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करताना प्रा सुकुमार कांबळे, अजिंक्य चांदणे ,अशोक आगावणे…
कामगारसंघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी अँड.किशोर खिलारे यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करताना प्रा सुकुमार कांबळे, ,अशोक आगावणे… व इतर
पंढरपूर:-आज मातंग समाजाचा जनाधार असणारा पक्ष नसल्याने मातंग समाज विविध पक्षात विखुरला आहे.सर्व समाज एकत्र आणून सत्तेतिल वाटा मातंग समाजासह वंचित घटकाला मिळाला पाहीजे यासाठी डेमोक्रेटिक पार्टी आँफ इंडिया (डी.पी.आय) मैदानात उतरली असून मातंग समाजाला फुले-शाहू आंबेडकर आण्णाभाऊ यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही हे समजून घेणे गरजेचे आहे असे आवहान डीपीआय चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी केले.ते पंढरपुर येथे डीपीआय ने आयोजीत केलेल्या चर्चा सत्रात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की सर्व आंबेडकरवादी पक्षाचा आपण अनूभव बघीतला आहे पण सक्षम पणे प्रस्थापिताची मक्तेदारी कोणीही तोडू शकले नाही. येणाऱ्या काळात डीपीआय निश्चित हि मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
डेमोक्रेटिक पार्टी आँफ इंडिया(डीपीआय)चे जिल्हास्तरीय चर्चा सत्र विठ्ठल ईन सभागृह पंढरपूर येथे रविवार दि.५जून रोजी डीपीआय चे संस्थापक प्रा.सुकुमार कांबळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाल याप्रसंगी ते बोलत होते.
मातंगाना महाराष्टातील सोशितांचे नेतृत्व करण्याची संधी–अजिंक्य चांदणे
डेमोक्रेटिक पार्टी आँफ इंडिया महाराष्टातील उपेक्षितांचे राजकीय अस्तित्व बनविण्यासाठी कार्य करत आहे या पक्षाचा जनाधार(कास्टबेस)मांतग समाजाने बनावे येणार्या काळात महाराष्टातील सोशितांचे नेतृत्व करण्याची संधी मातंग समाजाला मिळू शकते असे मत डीपीआय चे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केले. मातंग समाज आज वेगवेगळ्या पक्षात विखुरला आहे.त्यांना पक्ष नव्हता म्हणून ते ईतर पक्षात गेले होते आता स्वःतचा पक्ष डीपीआय आहे यात सर्वांना सामावुन घेऊन मातंगाना दखलपात्र करणे हा आमचा उद्देश्य आहे हे स्पष्ट करुन पक्षाचे राज्य अधिवेशन मुंबई येथे लवकरच घेणार असल्याची त्यांनी यावेळी घोषणा केली.
. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सोहम लोंढे,राज्य सचिव तात्या ठोंबरे,युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज मोरे यांचे सह अनेक जिल्हाध्यक्ष उपस्थीत होते .डीपीआय चे संस्थापक स्मृतीशेष आत्माराम चांदणे यांचे जयंतीनिमीत्त नुतन पदाधिकार्यांच्या निवडी व चर्चा सत्राचे आयोजन केले होते.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन चर्चा सत्राचे उद्घाटन झाले.
त्यानंतर मान्यवरांचे स्वागत होऊन सत्कार करण्यात आला. यानंतर नुतन पदाधिकार्यांच्या निवडी संस्थापक प्रा.सुकुमार कांबळे , प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी जाहीर केल्या.
डेमोक्रेटिक कामगार संघटनेच्या राज्याध्यक्ष पदी अँड.किशोर खिलारे तर डीपीआयचे जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक अंबादास वायदंडे यांची निवड जाहिर झाली.
पंढरपूर शहराध्यक्ष- अमित अवघडे यांचा सत्कार सोहम लोंढै करताना..
उपाध्यक्ष विशाल तुपसौंदर यांना निवडीचे पत्र देताना ,अशोक आगावणे एस.के.ऐवळे, अंबादास वायदंडे इतर
सचिव-उमेश पवार(माजी नगरसेवक) यांना निवडीचे पत्र देताना प्रा सुकुमार कांबळे, अजिंक्य चांदणे ,अशोक आगावणे,सोहम लोंढै व इतर
पंढरपूर शहराध्यक्ष- अमित अवघडे कार्याध्यक्ष-शंकर वाघमरे,उपाध्यक्ष-विशाल तुपसौंदर, सचिव-उमेश पवार(माजी नगरसेवक) तर तालुकाध्यक्ष-सुधाकर मस्के(गादेगाव) सचिव—संजय लोखंडे(सुस्ते) यांची निवड जाहीर करण्यात आली.नूतन पदाधिकार्याना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गुरु रविदास परिषदेचे राष्टींय अध्यक्ष अशोक आगावणे,होलार रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्टिय अध्यक्ष एस.के.ऐवळे सर यांनी डीपीआय मध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.किशोर खिलारे यांनी केले तर सुत्रसंचलन शंकर वाघमारे यांनी केले.आभार पृथ्वीराज मोरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील पदाधिकार्यांच्या सोबत संजय तुपसौंदर, मार्तंड कांबळे, विनोद वाघमारे, दशरथ यादथ,नाथा यादव,विठ्ठल वाघमारे,नेताजी वाघमारे,ब्रम्हदेव वायदंडे यांनी परिश्रम घेतले.कार्यकर्मासाठी सभागृह खचाखच भरले होते.