Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पूजा बागडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पन्हाळा- (कोल्हापूर शिंदेवाडी)- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी (शिंदेवाडी तालुका पन्हाळा) येथील सौ. पूजा दत्तात्रय बागडे यांची निवड झाली असून त्यांना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे नियुक्तीचे पत्र पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस सौ. छाया मोरे यांनी दिले आहे.
निवडीनंतर सौ. पूजा बागडे म्हणाल्या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना तळागाळात जाऊन सर्वसामान्य महिलांच्या जीवनमानात अडसर ठरणार गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करेन.
त्यांच्या या निवडीमुळे पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन होत असून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.