Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी सौ सुनंदा शिंदे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी सौ सुनंदा शिंदे यांना निवडीचे पत्र देताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे व इतर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

कोडोली- (शिंदेवाडी ता.पन्हाळा)- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी (शिंदेवाडी तालुका पन्हाळा) येथील सौ सुनंदा अंकुश शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य यांची निवड करण्यात आली शिंदेवाडी या ठिकाणी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मुसा भाई मुल्ला ,महिला आघाडीच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षा पूजा बागडे उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना सौ सुनंदा शिंदे म्हणाल्या पन्हाळा तालुक्यातील वाडीवस्तीवर अजूनही मूलभूत सुविधा नसून त्याची झळ ही मोठ्या प्रमाणात महिलांना बसत असून प्राथमिक सुविधांपासून वंचित असलेल्या सर्वच खेडे गावाना सोयी मिळण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुवर्ण शिंदे ,वंदना शिंदे, संगीता चव्हाण ,शोभा शिनगारे, प्रतिभा शिंदे, माधवी शिंदे ,अलका शिंदे, साधना शिंदे ,रेखा शिंनगारे ,शुभांगी शिंदे, संगीता शिंदे, सुशीला शिंदे, शोभा शिंदे, सुनंदा पाडळकर, स्वाती भिंगार्डे ,सुमन भिंगार्डे, मंदा पाडळकर, सुप्रिया खोमणे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close