एकविसाव्या शतकातील आदर्श चळवळ म्हणूनच पुरोगामी संघर्ष परिषदेची नोंद -महासचिव मारुतीराव बोभाटे यांचे प्रतिपादन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा:-सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या अनेक सामाजिक चळवळीना मरगळ झटका आली नाही आणि समाजाने सुद्धा अशा स्वयंकेंद्रित चळवळीतील नेत्यांना आंबेडकरी विचारांचा विसर पडल्यामुळे झिडकारल्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी स्त्री शक्तीची ताकद ओळखून पुरोगामी संघर्ष परिषद या सामाजिक संघटनेची स्थापना केली असून अल्पावधीतच संघटनेने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये तळागाळात जाऊन सामाजिक कार्य केले असून हीच सामाजिक चळवळ एकविसाव्या शतकामध्ये एक आदर्श चळवळ म्हणून इतिहासाला नोंद घ्यावी लागेल असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे महासचिव मारुतीराव बोभाटे यांनी केले.
ते सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे होते.
बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा सौ. वनिता जाधव यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना बोभाटे म्हणाले महाराष्ट्र राज्यामध्ये विभागवार दौरे करून संघटनेची बांधणी आणखी मजबूत करून सामाजिक कार्याची आवड असलेल्या अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना व नागरिकांना पुरोगामी संघर्ष परिषदेमध्ये सामावून घेऊन सामाजिक संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले. सदर बैठकीस प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते.
शेवटी आभार जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भिसे यांनी मानले.