राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमीत्त व्याख्यानमाला
फकिरा दल अक्कलकोट शाखेचा उपक्रम

(फकिरा दल राज्याध्यक्ष सतिश कसबे आपले विचार व्यक्त करताना))
जोशाबा टाईम्स वेब न्यूज़ पोर्टल
श्रीकांत कसबे
अक्कलकोट:-अण्णाभाऊ साठे नगर माणिक येथे फकीरा दलाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती व्याख्यानमाला घेत जयंतीची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्ती लक्ष्मण पारखे (मातंग समाज अध्यक्ष) हे होतू तर प्रमुख वक्ते म्हणून सतीश कसबे (फकिरा दल प्रमुख तथा उपाध्यक्ष -बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य) युवराज पवार (अध्यक्ष- सोलापूर मातंग समाज समिती जिल्हा व शहर) दिलीप भाऊ (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सिद्धे) अमर भाऊ शिरसाट (प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष) यांनी मनोगत व्यक्त केले.
(युवराज पवार अध्यक्ष मातंग समाज सोलापुर शहर)
यावेळी प्रमुख पाहुणे किसन भाऊ जाधव,कुपेंद्र ढाले,भानदास देडे, सुरेश पारखे ,फुलाजी कांबळे पुजारी, सिद्धू ढोबळे, लिंबाजी ढोबळे, ताराबाई शिरसागर मुक्ताबाई ढोबळे, नागेश जाधव, हुसेन बरोळगी,रशीद किस्तके ,मोसिन मोकाशी, सैपन पठाण ,स्वामी कांबळे, मंजू नाईकनवरे,सुरेश सोनकांबळे, अंबादास शिंगे, अमोल क्षिरसागर, विकी गायकवाड,सागर देडे, रोहित मुतनकेशी,समर्थ कोळी, सोनू देडे,बाळशंकर, खाजाप्पा माशाळे, महेश सुरवसे, भागवत विभुते, महेश घाटे आदी समाज बांधव तसेच तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज कांबळे व आभार आयोजक जय भाऊ पारखे यांनी मानले.