सामाजिक लढा देताना गुंडागिरीला थारा देऊ नका–राष्ट्रीय अध्यक्ष- प्रा.सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे सोबत राज्य मुख्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे,जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, राज्य कार्यकारिणी सदस्य नेताजी अवघडे, जिल्हाध्यक्षा ज्योती अवघडे, विलास वसेकर इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-सामाजिक चळवळ ही तळागाळातील लोकांना न्याय देणारं एक प्रकारचे न्यायालय असून सर्वसामान्य जनतेला अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणारी ती ताकत आहे सामाजिक लढा देत असताना भले राजकारणाच्या मागची गुंडगिरी असो किंवा गुंडगिरीच्या मागचं राजकारण जरी असले तरी अशा प्रकारच्या गुंडगिरीला अजिबात थारा देऊ नका जशास तसे वागून अन्याय पीडित जनतेला न्याय देण्याचं काम करण्याची धमक चळवळीमध्ये असली पाहिजे अशा प्रकारचा गर्भित सल्ला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिला.ते पंढरपूर येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बैठकीत बोलत होते.
स्वार्थापोटी गुंडांना राजकारणामध्ये जपले जाते आणि ते समाजासाठी फार घातक असून गुंडगिरी जर अशीच फोफावली तर भविष्यात समाज आपल्या दावणीला बांधणारे हुकुमशहा तयार होतील आणि लोकशाही धोक्यात येईल असे हे प्रा. वायदंडे म्हणाले.
स्वागत पंढरपूर तालुका अध्यक्ष अण्णासाहेब फाळके यांनी केले तर प्रास्ताविक वरिष्ठ जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड यांनी केले सदर बैठकीस महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य नेताजी अवघडे, जिल्ह्याच्या वरिष्ठ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. ज्योती अवघडे, जिल्हा सल्लागार कमिटीचे अध्यक्ष तानाजी खिलारे ,मोहोळ तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, समाधान कांबळे, सुनील गायकवाड ,दत्तात्रय कांबळे, दादा कांबळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार युवकचे जिल्हाध्यक्ष विलास वसेकर यांनी मानले.