कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयास “राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय पुरस्कार” प्राप्त

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर (स्वायत्त) या महाविद्यालयास “राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला आहे”. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन 2022 चा आदर्श महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार वितरण राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.संतोषजी निकम साहेब महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ सर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ. दत्तात्रय काळेल सर सोलापूरच्या मा. महापौर सौ. अरुणाताई वाकसे व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूरचे मा. प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या उप उपप्राचार्य डॉ.सौ. लतिका बागल यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. महाविद्यालयाला राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाल्याने रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील साहेब,सचिव, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे , संस्थेच्या मध्यवर्ती विभागाचे चेअरमन मा. संजीवकुमार पाटील, प्राचार्य डॉ. सी. जे. खिलारे तसेच कला शाखेचे उप प्राचार्य डॉ.चांगदेव कांबळे व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य बी.बी शितोळे यांनी अभिनंदन केले. व सर्व रयत सेवक आणि रयतप्रेमी यांनी हा पुरस्कार महाविद्यालयास मिळाल्याने आनंद आनंद व्यक्त केला आहे.