डाँ.बाबासाहेब आंबेडकर अवमान प्रकरणी न्या.मल्लिकार्जुन गौडा यांचे प्रतीमेस चप्पला मारुन निषेध
पुरोगामी संघर्ष परिषदे कर्नाटक चे युवक प्रदेशाध्यक्ष लखन वायदंडे यांचे नेतृत्वाखाली संपन्न झाले निषेध आंदोलन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*कलौती* (ता.कागवाड) पुरोगामी संघर्ष परिषदेचे कर्नाटक राज्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष लखन वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली कलौती (ता.कागवाड) या ठिकाणी 26 जानेवारी रोजी रायचूर जिल्हा न्यायालयामध्ये डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढल्याशिवाय मी ध्वजारोहन करणार नाही म्हणून प्रतिमा काढणाऱ्या न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या पुतळ्यास चपलाने मारहाण करून कर्नाटक राज्य पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी रवी वायदंडे, किरण वायदंडे ,लवा वायदंडे ,सचिन वायदंडे, प्रदीप वायदंडे, प्रज्वल वाघमारे ,संघम भजंत्री ,अर्जुन वाघमारे, आप्पासाहेब वाघमारे,संजय वायदंडे ,संतोष वायदंडे, प्रशांत मोरे, सचिन भजंत्री, नितीन वायदंडे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी होते.