महिलावरील अत्याचार संदर्भात सर्व पक्षप्रमुखाना प्रा.सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटणार –प्राचार्य बाळासाहेब साठे
पुरोगामी संघर्ष परिषदेची आक्रमक भूमिका

प्राचार्य बाळासाहेब साठे प्रदेशाध्यक्ष
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
कराड:- सामाजिक चळवळीच्या माध्यमातून नुसत्या घोषणा, मोर्चे, मेळावे घेऊन महिला वरील अत्याचार रोखता येणार नसल्याची भावना पुरोगामी संघर्ष परिषदेची झाल्यामुळे आता महिलांना नुसतं आरक्षण म्हणून चालणार नाही तर त्यांना राजकारणामध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवून सत्तेचा वाटाही 50%टक्के असावा आणि घटना दुरुस्ती करून पहिली अडीच वर्षे महिला मुख्यमंत्री व गृहमंत्री ही महिलाच असावी असा प्रत्येक राज्यात हा कार्यक्रम राबवण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली 101 जणांचे शिष्टमंडळ प्रत्येक राजकीय पक्षप्रमुखांना भेटून पक्षाच्या घटनेत तशी दुरुस्ती करण्यासाठी आग्रही राहून आक्रमक भूमिका मांडणार असल्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकातात म्हटले आहे.
प्राचार्य बाळासाहेब साठे यानी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, महिलावर अत्याचार होतच आहेत पुरुषप्रधान संस्कृती अत्याचार झाल्यानंतर निषेध नोंदवण्या पलीकडे काहीही करू शकली नसल्यामुळे आता महिला वरील अत्याचार रोखण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेने आक्रमक पाऊल उचलल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या घटनेमध्ये दुरुस्तीच करावी लागणार आहे. नसेल तर पुरोगामी संघर्ष परिषद सदर पक्षाच्या विरोधात जनआंदोलन उभा करणार असल्याचेही म्हटले आहे.